बीड: बनावट नोटांचे केज कनेक्शन! चक्क माजी सरपंच अडकला तामिळनाडूतील बनावट नोटांच्या रॅकेटमध्ये...
तामिळनाडू पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत केज तालुक्यातील डोका गावच्या माजी सरपंचासह एका व्यापाराला 8 लाख 37 हजार रुपयांच्या बनावट नोटांसह अटक केल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बनावट नोटांच्या रॅकेटचं केज कनेक्शन!
चक्क माजी सरपंच अडकला तामिळनाडूतील बनावट नोटांच्या रॅकेटमध्ये...
बीड- रोहिदास हातागळे: तामिळनाडूतील बनावट नोटांच्या रॅकेटमध्ये बीडच्या केज तालुक्यातील माजी सरपंचासह एका व्यापाराचा सहभाग असल्याची बातमी समोर आली आहे. तामिळनाडू पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत केज तालुक्यातील डोका गावच्या माजी सरपंचासह एका व्यापाराला 8 लाख 37 हजार रुपयांच्या बनावट नोटांसह अटक केल्याची माहिती आहे. तामिळनाडूच्या तिरुचिरापल्ली जिल्ह्यात थुवकुडी पोलिसांनी 21 जानेवारी रोजी ही कारवाई केल्याचं वृत्त आहे.
पेट्रोल पंपावर बनावट नोटा दिल्या अन्...
केज तालुक्यातील डोका गावचे माजी सरपंच रमेश बाबुराव भांगे (54 वर्षे) आणि व्यावसायिक नारायण राम (34 वर्षे) हे दोघे कार नंबर (एम एच- 44/ झेड-2383) मधून तामिळनाडू राज्यात गेले होते. 21 जानेवारी रोजी तिरुचिरापल्लीतील थुवकुडी येथील पेट्रोल पंपावर त्यांनी इंधन भरलं आणि इंधन भरल्यानंतर त्या पेट्रोल पंपावर त्यांनी बनावट नोट दिली होती. आपल्याला बनावट नोटा दिल्याचं पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं आणि याची जाणीव होताच त्यांनी तातडीने स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली.
हे ही वाचा: "सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार आहेत, याबाबत मला माहिती नव्हती", शपथविधीच्या आधी शरद पवारांनी केला खुलासा
पोलिसांनी आरोपींना घेतलं ताब्यात
संबंधित प्रकरणाची माहिती मिळताच तामिळनाडू पोलिसांनी त्यांची कार चेकपोस्ट अडवून कारची झडती घेतली. त्यात पोलिसांना 200 रुपयांच्या नोटांची 41 बंडले सापडली. त्यानंतर, प्रकरणाचा गांभार्य लक्षात घेऊन त्वरीत सीआयडी (CID)कडे याचा तपास सोपवण्यात आला. पोलिसांनी रमेश भांगे आणि नारायण राम यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून दोन्ही आरोपींनी थुवकुडीपूर्वी मदुराई, पुदुक्कोट्टई आणि तंजावर भागातही बनावट नोटा चलनात आणल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आली.
पोलिसांचा तपास
आरोपींनी आणखी कुठे कुठे बनावट नोटा चलनात आणल्या? बनावट नोटा कुठून आणल्या आणि त्या कुठे छापल्या गेल्या? तसेच या नोटांचे तामिळनाडू कनेक्शन काय आहे? याचा तपास सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, बनावट नोटांच्या रॅकेटमुळे बीड जिल्हा आणि केज तालुका पुन्हा चर्चेत आल्याचं पाहायला मिळतंय.










