डॉक्टर सुलेमानने पत्नीसह मिळून आजारी मोलकरणीला दिले इंजेक्शन, नंतर 14 महिने केला अत्याचार, पोलिसांनी तक्रारीला नकार दिल्याने मोलकरणीने उचलले 'हे' पाऊल

मुंबई तक

Crime News : एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका डॉक्टरने त्याच्या घरात घरकाम करणाऱ्या तरुणीवर तब्बल 14 महिने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित तरुणीचे वडील परदेशात राहत असल्याचा फायदा घेत, डॉक्टर आणि त्याच्या पत्नीने विश्वासाने तिला कामावर बोलावले होते. मात्र, याच विश्वासाचा गैरफायदा घेत डॉक्टरने तिच्या आयुष्याशी खेळ मांडला.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

डॉक्टर सुलेमानने पत्नीसह मिळून आजारी मोलकरणीला दिले इंजेक्शन

point

नंतर 14 महिने केला अत्याचार

point

पोलिसांनी दखल घेण्यास नकार दिल्याने मोलकरणीने उचलले 'हे' पाऊल

Crime News : एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका डॉक्टरने त्याच्या घरात घरकाम करणाऱ्या तरुणीवर तब्बल 14 महिने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित तरुणीचे वडील परदेशात राहत असल्याचा फायदा घेत, डॉक्टर आणि त्याच्या पत्नीने विश्वासाने तिला कामावर बोलावले होते. मात्र, याच विश्वासाचा गैरफायदा घेत डॉक्टरने तिच्या आयुष्याशी खेळ मांडला. डॉ. सुलेमान असं या नराधम डॉक्टरचं नाव आहे. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर परिसरातील ही घटना आहे.

हे ही वाचा : सातारा : प्राध्यापकाचे तरुणीला अश्लील मेसेज, नंतर शरीरसुखाची मागणी, लाज आणणारा प्रकार

बेशुद्ध करुन अत्याचार

पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, एक दिवस तिची प्रकृती बिघडली असता डॉ. सुलेमानने तिला इंजेक्शन देऊन औषध दिले. यामुळे ती बेशुद्ध झाली आणि त्या अवस्थेत डॉक्टरने तिच्यावर बलात्कार केला. सुमारे तीन तासांनंतर तिला जाग आली असता, तिच्यावर अत्याचार झाल्याचे तिच्या लक्षात आले. जेव्हा तिने या प्रकाराचा जाब विचारला तेव्हा डॉक्टरने तिचे अश्लील व्हिडिओ चित्रीकरण केल्याचे दाखवून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. धक्कादायक बाब म्हणजे, या संपूर्ण प्रकारात डॉक्टरची पत्नी आबिदा ही देखील पतीला साथ देत होती.

सलग 14 महिने अत्याचार

पुढील 14 महिने अश्लील व्हिडिओच्या जोरावर डॉक्टरने पिडीतेचे लैंगिक शोषण केले. तिला सतत मानसिक त्रास देऊन या प्रकाराची कोणाकडेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात येत होती. काही दिवसांपूर्वी पीडितेचे वडील परदेशातून परतल्यानंतर तिने धीर एकवटून सर्व घटना त्यांना सांगितली. यानंतर वडिलांनी तिला घेऊन पोलीस ठाणे गाठले. सुरुवातीला पोलिसांनी आरोपीला अटक केली, मात्र काही तासांतच त्याची सुटका केल्याने पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp