"सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार आहेत, याबाबत मला माहिती नव्हती", शपथविधीच्या आधी शरद पवारांनी केला खुलासा
शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या महाराष्ट्र उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आज (31 जानेवारी 2026) सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार आहेत, याची आपल्याला काहीच माहिती नसल्याची शरद पवारांनी सांगितलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
"सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार आहेत, याबाबत मला माहिती नव्हती"
शपथविधीच्या आधी शरद पवारांनी केला खुलासा
Sharad Pawar: शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या महाराष्ट्र उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आज (31 जानेवारी 2026) सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर (बारामती येथील विमान दुर्घटनेत) हे राजकीय संक्रमण घडत आहे.
"सुनेत्रा पवार शपथ घेण्याबाबत मला काहीच माहिती नव्हती..."
यासंबंधी शरद पवार बोलताना म्हणाले, "सुनेत्रा पवार शपथ घेत आहेत, याबाबत मला कोणतीही माहिती नाही. हा निर्णय त्यांच्या पक्षाने घेतला असेल. आज सकाळी वर्तमानपत्रात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी चर्चा केल्याचं मला समजलं, पण मला याची पूर्व माहिती नव्हती. सुनेत्रा पवार यांच्याशी माझी कोणतीही चर्चा झालेली नाही. तटकरे आणि पटेल यांनीच पुढाकार घेतला असावा."
ते पुढे म्हणाले,"एनसीपीला पुढे काय करायचं हे त्यांचे निर्णय आहे. मी ते ठरवणार नाही. अजित पवार यांची इच्छा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र यावेत अशी होती. त्यासाठी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या चार महिन्यांपासून चर्चा सुरू होत्या. फेब्रुवारी 12 ला विलीनीकरण होईल, असे अजित यांचे मत होते. पण दुर्घटनेमुळे ही प्रक्रिया थांबली असून आता हे होईल की नाही याची मला माहिती नाही."
हे ही वाचा: '12 तारखेला राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची घोषणा होणार होती', सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीआधी शरद पवार काय म्हणाले?
एनसीपी (अजित पवार गट) चं नेतृत्व?
अजित पवार यांच्या निधनानंतर एनसीपी (अजित पवार गट) मध्ये नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. सुनेत्रा पवार या राज्यसभा खासदार असून, आज दुपारी 2 वाजता एनसीपीच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांना विधिमंडळ पक्षनेते म्हणून निवडले जाणार आहे. दोन्ही एनसीपी गट एकत्र येण्याच्या चर्चेला यामुळे धक्का बसू शकतो. शरद पवार गट आणि अजित गट यांच्यातील एकीकरणाची प्रक्रिया अजित पवारांच्या इच्छेनुसार सुरू होती, पण आता सुनेत्रा पवार यांच्या भूमिकेमुळे स्थिती बदलू शकते. शरद पवार यांनी भावनिक पातळीवर म्हटले की, "अशी परिस्थिती उद्भवली आहे की कोणीतरी पुढे यावे लागेल. पक्षाने निर्णय घेतला असेल तर त्याला मान्यता द्यावी लागेल."










