'12 तारखेला राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची घोषणा होणार होती', सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीआधी शरद पवार काय म्हणाले?
Sharad Pawar : आज सायंकाळी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार अशी चर्चा असतानाच राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी सकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या, 12 तारखेला याचा निर्णय होणार होता. मात्र अजितदादांच्या अपघातामुळे यामध्ये खंड पडल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार आहेत याविषयी माझ्याशी कोणीही चर्चा केलेली नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
12 तारखेला राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची घोषणा होणार होती
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीआधी शरद पवारांचा गौप्यस्फोट
Sharad Pawar : आज सायंकाळी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार अशी चर्चा असतानाच राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी सकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या, 12 तारखेला याचा निर्णय होणार होता. मात्र अजितदादांच्या अपघातामुळे यामध्ये खंड पडल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार आहेत याविषयी माझ्याशी कोणीही चर्चा केलेली नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
हे ही वाचा :
काय म्हणाले शरद पवार?
सुनेत्रा पवार आज सायंकाळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्याआधी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार आहेत याविषयी विचारले असता ते म्हणाले की, 'याविषयी माझ्याशी कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. याविषयी चर्चा मुंबईत चालू आहे. प्रफुल पटेल, सुनील तटकरे हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांनी प्राधान्याने काय करावं हे त्यांनी ठरवलेलं दिसतंय. मी त्यावर भाष्य करणार नाही. हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे. तो त्यांचा अधिकार आहे.'
चार महिन्यांपासून चर्चा
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या त्याविषयी पवार म्हणाले की, ही चर्चा अजित पवार, जयंत पाटील यांच्यामध्ये चालू होती. यामध्ये मी सहभागी नव्हतो. मात्र ही चर्चा सकारात्मक रीतीने चालू होती. ते सर्वांना एकत्रित करण्याच्या प्रक्रियेच्या जवळ येऊन पोहोचले होते. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात यावर गेल्या चार महिन्यांपासून चर्चा चालू होती. मात्र या अपघातामुळे या चर्चेत खंड पडला आहे.