भाजप आमदार मंदा म्हात्रेंना ह्रदयविकाराचा झटका, प्रकृती स्थिर असल्याची माहिती, एकनाथ शिंदेंकडून विचारपूस
BJP MLA Manda Mhatre suffers heart attack : आमदार म्हात्रे यांच्या प्रकृती बिघडल्याचे वृत्त समजताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे त्यांच्याशी थेट संवाद साधला आणि तब्येतीची सविस्तर विचारपूस केली. "घाबरण्याचे काहीच कारण नाही, बेलापूरमधील गोर-गरीब जनतेचे आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत. तुम्ही चिंता करु नका आम्ही तुमच्यासोबत आहोत," अशा शब्दांत शिंदेंनी त्यांना दिलासा दिला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भाजप आमदार मंदा म्हात्रेंना ह्रदयविकाराचा झटका,
प्रकृती स्थिर असल्याची माहिती, एकनाथ शिंदेंकडून विचारपूस
BJP MLA Manda Mhatre suffers heart attack : बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांना मंगळवारी पहाटे हृदयविकाराचा झटका आल्याने नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पहाटे अडीचच्या सुमारास त्यांना अचानक त्रास जाणवू लागल्याने कुटुंबीयांनी तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवले आहे.. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर आवश्यक ते उपचार सुरू आहेत. यासंदर्भात माहिती देताना त्यांचे सुपुत्र निलेश म्हात्रे यांनी सांगितले की, प्राथमिक उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
एकनाथ शिंदेंकडून प्रकृतीची विचारपूस
आमदार म्हात्रे यांच्या प्रकृती बिघडल्याचे वृत्त समजताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे त्यांच्याशी थेट संवाद साधला आणि तब्येतीची सविस्तर विचारपूस केली. "घाबरण्याचे काहीच कारण नाही, बेलापूरमधील गोर-गरीब जनतेचे आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत. तुम्ही चिंता करु नका आम्ही तुमच्यासोबत आहोत," अशा शब्दांत शिंदेंनी त्यांना दिलासा दिला. तुम्ही लवकरच पूर्णपणे बऱ्या होऊन पुन्हा एकदा जनसेवेच्या कार्यात सक्रिय व्हाल, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
इतर महत्त्वाच्या बातम्या










