सरकारी हॉस्टेलवर राहणाऱ्या तीन अल्पवयीन आदिवासी विद्यार्थिनी प्रेग्नंट, आरोपी कोण? काँग्रेसच्या आमदारांचा खळबळजनक दावा
Crime News : एका आदिवासी विद्यार्थिनींच्या सरकारी हॉस्टेलमधील तीन अल्पवयीन विद्यार्थिनी गर्भवती राहिल्याने खळबळ उडाली आहे. माध्यमांनी हे प्रकरण लावून धरल्यानंतर याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने चौकशीचे आदेश जारी केले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, याप्रकरणाच्या चौकशीसाठी चार सदस्यांची एक समिती गठित करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सरकारी हॉस्टेलवर राहणाऱ्या तीन अल्पवयीन आदिवासी विद्यार्थिनी प्रेग्नंट,
भाजपकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न; काँग्रेसचा आरोप
Crime News : एका आदिवासी विद्यार्थिनींच्या सरकारी हॉस्टेलमधील तीन अल्पवयीन विद्यार्थिनी गर्भवती राहिल्याने खळबळ उडाली आहे. माध्यमांनी हे प्रकरण लावून धरल्यानंतर याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने चौकशीचे आदेश जारी केले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, याप्रकरणाच्या चौकशीसाठी चार सदस्यांची एक समिती गठित करण्यात आली आहे. छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील ही घटना आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनंतर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. याविषयी विधानसभेत काँग्रेसच्या आमदारांनी भाजप सरकारला धारेवर धरले.
हे ही वाचा : गॅस सिलिंडर चोरांचा सुळसुळाट, जालन्यात 110 सिलिंडर लंपास, नागरिकांमध्ये वेगळ्याच चर्चांना उधाण
'सात दिवसांच्या आत अहवाल द्या'
या प्रकरणी चौकशीसाठी बनवण्यात आलेल्या समितीचे नेतृत्व अतिरिक्त जिल्हाधिकारी करणार आहेत. त्यांच्यासोबतच या समितीत आदिवासी विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त, बिजापूरचे जिल्हा शिक्षणाधिकारी आणि जिल्हा रुग्णालयातील सिव्हिल सर्जन यांचाही समावेश या समितीत असणार आहे. सात दिवसांच्या आत या प्रकरणाचा अहवाल देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
या प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले आहे. याचे पडसाद छत्तीसगडच्या विधानसभेत उमटलेले पहायला मिळाले. भाजप सरकार हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसच्या आमदारांनी केला. हे प्रकरण बाहेर आल्यानंतर सरकारने या तिघी पीडित विद्यार्थिनींना घरी पाठवले आणि त्या हॉस्टेलवर रहात नसल्याचे सांगितले, असा दावाही काँग्रेसने केला आहे.










