आईसोबत अनैतिक संबंधाचा संशय, लेकानं तरुणाला दगडानं ठेचलं

Chandrapur crime : चंद्रपूर जिल्ह्यातील रामनगर परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला. महिलेवर एका व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याच्या संशयातून गुरुवारी रात्री उशिराने मोठं हत्याकांड घडलं. पोलिसांनी मित्रनगरचा रहिवासी असलेल्या आरोपी तरुणाला अटक केली आहे, नेमकं प्रकरण काय जाणून घ्या.

ADVERTISEMENT

Chandrapur crime
Chandrapur crime
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा

point

आईसोबत अनैतिक संबंध असल्याचा त्यांनी संशय

point

डोक्यावर दगडाने हल्ला करत प्रहार

Chandrapur Crime : चंद्रपूर जिल्ह्यातील रामनगर परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला. महिलेवर एका व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याच्या संशयातून गुरुवारी रात्री उशिराने मोठं हत्याकांड घडलं. पोलिसांनी मित्रनगरचा रहिवासी असलेल्या अजय उर्फ अॅपल शंकर पोहनकर याला अटक केली. मृत व्यक्ती अमरावतीचा रहिवासी असून संतोष अरुण भेंडे (वय 48) अशी ओळख पटली. 

हे ही वाचा : Astrology : जुलै महिन्यात 'या' राशींना मिळणार यश आणि समृद्धी

डोक्यावर दगडाने हल्ला करत प्रहार

पोलिसांच्या माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्री मित्रनगर चौकात मोठा वाद झाला होता. 112 नंबर डायल करून पोलिसांना या घटनेची फोनद्वारे माहिती दिली, तेव्हा रामनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. इतक्यात संतोष भेंडे हा रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत होता. प्राथमिक तपासातून समोर आले की, ज्याने हल्ला केला त्या आरोपीने मृतदेहावर लाथा मारल्या, नंतर निर्दयीपणे संपवलं. डोक्यावर दगडाने हल्ला करत प्रहार केला. डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्याचा मृत्यू झाला. 

रामनगर पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन तपास केला, तसेच आजुबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास अजिबात वेळ घालवला नाही. त्यांनी बसस्थानक आणि रेल्वे स्थानकासह संभाव्य ठिकाणी रात्रभर आरोपीचा शोध घेतला, मात्र तो कुठेही सापडला नाही. दुसऱ्याच दिवशी स्टेशन प्रभारी एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली, तांत्रिक माहितीच्या आधारे, आरोपी वडगाव परिसरात लपून बसला होता.  

आईसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय

अशातच चौकशीदरम्यान, संतोष भेंडे अनेकदा आरोपीच्या घरी गेला होता. त्याने महिलांचा छळ अधिक केला होता. मृताच्या आईसोबत अनैतिक संबंध असल्याचा त्यांनी संशय व्यक्त केला. बऱ्याच दिवसांपासून त्याच्या मनात संतोषचा राग होता. गुरुवारी रात्रीच्या सुमारास, दोघे मित्रनगर चौकात समोरासमोर आले, त्यांचा मोठा वाद झाला, नंतर वादाला हिंसक वळण मिळाले. 

रागाच्या भरात अनियंत्रित झालेल्या अजयने संतोषला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. नंतर डोक्यात दगड घालून हल्ला केला. या हल्ल्यात संतोष हा सिमेंटच्या कव्हरवर आदळून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आरोपीने पोलिसांना सांगितलं की, संतोष फक्त बेशुद्ध अवस्थेत पडला आहे, असं सांगून आरोपी हा घटनास्थळावरून पळून गेला. 

हे ही वाचा : नागपूर : नवऱ्याला घटस्फोट दिला, अन् दुसऱ्याच दिवशी महिलेची हत्या, नेमकं काय घडलं?

प्राथमिक तपासातून समोर आले, हे प्रकरण कौटुंबिक वाद आणि अनैतिक संबंधांच्या संशयातून घडलं. अशातच पोलीस या प्रकरणाचा संपूर्ण शोध घेत आहे. आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली. रामनगर पोलिसांच्या कारवाई आणि तांत्रिक तपासामुळे खळबळजनक खून प्रकरणाचा काही तासांत छडा लावण्यात आला.