नवऱ्याने बायकोला अश्लील व्हिडिओ दाखवले, नंतर अनैसर्गिक कृत्य केलं अन्..

मुंबई तक

Crime News : एका पीडित महिलेसोबत तिच्या सासरच्या घरी भयंकर छळण्यात आल्याचा आरोप आहे. तिचा नवरा अश्लील व्हिडिओ दाखवायचा, नंतर अनैसर्गिक कृत्य करायचा, असे गंभीर आरोपी पीडितेनं केले. पीडितेनं महिला पोलीस ठाण्यात नवरा, सासू आणि दीराच्या विरोधात तक्रार दाखल केली.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

नवऱ्याने बायकोला अश्लील व्हिडिओ दाखवून लैंगिक शोषण केलं 

point

सासरच्या मंडळींकडून पीडितेचा छळ

point

पीडितेला गोळ्या दिल्या 

Crime News : एका पीडित महिलेला तिच्या सासरच्या घरी भयंकर छळल्याचा आरोप आहे. तिचा नवरा अश्लील व्हिडिओ दाखवायचा, नंतर अनैसर्गिक कृत्य करायचा, असे पीडितेनं गंभीर आरोप केले. पीडितेनं महिला पोलीस ठाण्यात नवरा, सासू आणि दीराच्या विरोधात तक्रार दाखल केली. ही संपूर्ण घटना गुजरातच्या शहिबाग परिसरात घडली आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस देखील हादरून गेले. 

हे ही वाचा : आईसोबत अनैतिक संबंधाचा संशय, लेकानं तरुणाला दगडानं ठेचलं

नवऱ्याने बायकोला अश्लील व्हिडिओ दाखवून लैंगिक शोषण केलं 

पीडितेनं तिच्या तक्रारीच्या आधारे सांगण्यात आले की, तिच्या पतीने तिला अश्लील व्हिडिओ दाखवून पाहण्यास भाग पाडले, नंतर विकृत पद्धतीने लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. एवढंच नव्हे तर गरोदरपणात तिला लाथा मारण्यात आल्या, नंतर गर्भपात करण्यास दबाव टाकण्यात आल्याचा आरोप आहे. अशातच पीडितेच्या सासरच्या मंडळींना तिची शारीरिक आणि मानसिक छळ केला होता, तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली. याच त्रासाला कंटाळून पीडिता अहमदाबादच्या महिला पोलीस ठाण्यात गेली, नंतर तिने आपला अनुभव सांगितला. तिच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला. 

सासरच्या मंडळींकडून पीडितेचा छळ

तक्रारीच्या, त्या महिलेचा विवाह हा 2011 मध्ये झाला, परंतु लग्नानंतर 15 दिवसानंतर तिच्या सासरच्या मंडळींना तिला वाईट वागणूक देण्यास सुरूवात केली. लग्न झाल्यानंतर नवऱ्याचा आधीच विवाह झाल्याचं कांड समोर आलं, त्याला एक मुल देखील आहे, हिच गोष्ट तिच्यापासून लपवली जात होती. विवाहानंतर तिची सासू आणि दीर तिला हुंड्यावरून टोचून बोलू लागले. गरोदर असूनही, तिला पुरेशी विश्रांती नाकारली गेली आणि तिच्याकडून घरकाम करून घेतले. 

पीडितेला गोळ्या दिल्या 

त्यांच्या मुलीचा जन्मानंतरही तिच्या नवऱ्याने महिलेचा छळ केला. तो अनेकदा रात्री उशिरा घरी यायचा, नंतर संमतीशिवाय तिच्यावर जबरदस्ती करायचा. पत्नी आजारी असल्यास तिला कमोत्तेजक औषध दिली जायची. नंतर तिच्याशी लैंगिक संबंध ठेवयाचा, तिने नकार दिल्यास तिला बेदम मारहाण करायचा. काहीच दिवसांनंतर पत्नी गरोदर राहिली होती, तेव्हा पतीने तिचा गर्भपात केला. तिने नकार दिल्यानंतर घटस्फोटाची धमकी देखील दिली. 

हे वाचलं का?