मोठी बातमी : ठाण्यात TET चा पेपर फुटला, परीक्षा पुढे ढकलली, परिपत्रक जाहीर
ठाण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उद्या होणारा TET चा पेपर आजच काही लोकांकडे आढळून आला आहे. यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मोठी बातमी : ठाण्यात TET चा पेपर फुटला,
परीक्षा पुढे ढकलली,
परिपत्रक जाहीर
TET Paper Leak : ठाणे जिल्ह्यात शिक्षक पात्रता परीक्षेचा (TET) पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उद्यापासून (28 जून) सुरू होणाऱ्या या परीक्षेचा पेपर काही लोकांकडे सापडला आहे. शिक्षण विभागाकडून आता या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी केली जात आहे. त्यामुळे उद्या होणारा TET चा पेपर रद्द करण्यात आला आहे. याविषयी परीक्षा परिषदेने एक परिपत्रक जारी केले आहे.
परिपत्रकात काय म्हटलंय?
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत दि. 28 जून 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकूण १०२८ केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2026घेण्याचे प्रस्तावित होते. NEET 2026 च्या परीक्षेमधील गैरप्रकार लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना केलेल्या होत्या.
तथापि, आज दि.27 जून, 2026 रोजी पहाटेच्या सुमारास गोपनिय माहितीच्या आधारे भिवंडी येथे काही इसमांकडे या प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याचे समजल्याने भिवंडी पोलीस यांनी सदर ठिकाणी धाड घातली. यानंतर तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावून तातडीने पडताळणी केली असता, सदर इसमांकडे शिक्षक पात्रता परीक्षा (TET) जून 2026 परिक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचे आढळून आल्याने भिवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.
सदर परिस्थिती लक्षात घेता दि. 28 जून, 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पुढे ढकलण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पूर्ण पारदर्शकपणेच व्हावी हा परीक्षा परिषदेचा आग्रह असल्याने व याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे वाटत असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे.









