AIMIM मधून शिंदेसेनेत प्रवेश करताच सहर शेखच्या वडिलांवर मोठी जबाबदारी
Sahar Shaikh father yunus shaikh joins shinde shiv sena : सहर शेख यांचे वडील युनुस इकबाल शेख यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांची अखिल भारतीय केबल सेनेच्या कळवा-मुंब्रा विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
AIMIM मधून शिंदेसेनेत प्रवेश करताच सहर शेखच्या वडिलांवर मोठी जबाबदारी
अखिल भारतीय केबल सेनेच्या कळवा-मुंब्रा विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती
Sahar Shaikh father yunus shaikh joins shinde shiv sena : मुंब्रा येथील नगरसेविका सहर शेख हिचे वडील युनुस इकबाल शेख यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. पक्षप्रवेशानंतर त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांची शिवसेना अखिल भारतीय केबल सेनेच्या कळवा-मुंब्रा विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचा कालावधी एक वर्षाचा असणार आहे. अखिल भारतीय केबल सेनेचे अध्यक्ष टोनी सिरिल डिसोझा यांनी युनुस शेख यांना नियुक्तीपत्र दिले आहे. या पत्रात त्यांच्यावर सोपवण्यात आलेल्या जबाबदारीचा उल्लेख करण्यात आला आहे.
शिवसेना अखिल भारतीय केबल सेनेच्या कळवा-मुंब्रा विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती
युनुस शेख यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखालीही काम केले आहे. त्यानंतर त्यांनी एमआयएममध्ये प्रवेश केला होता. मुलगी सहर शेख हिला नगरसेवकपदासाठी उमेदवारी न मिळाल्याने युनुस शेख यांनी एमआयएममध्ये प्रवेश केला होता. आता त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला असून, त्यानंतर त्यांची शिवसेना अखिल भारतीय केबल सेनेच्या कळवा-मुंब्रा विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे युनुस शेख यांच्या पक्षबदलानंतर त्यांच्यावर सोपवण्यात आलेल्या नव्या जबाबदारीची चर्चा सुरू झाली आहे.
‘संपूर्ण मुंब्रा हिरवा करून टाकू’, भाषणामुळे सहर शेख झाली होती व्हायरल
सहर शेख ही मुंब्रा येथील नगरसेविका आहे. तिच्या एका भाषणामुळे ती महाराष्ट्रासह देशभरात चर्चेत आली होती. ‘संपूर्ण मुंब्रा हिरवा करून टाकू’, अशा आशयाचे विधान तिने केले होते. या विधानाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्याने सहर शेख देशभरात चर्चेचा विषय ठरली होती. तिच्या या विधानामुळे तिचे नाव राज्याच्या राजकीय वर्तुळातही चर्चेत आले होते. आता तिचे वडील युनुस शेख यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने आणि त्यांना पक्षात पद देण्यात आल्याने या घडामोडीकडे लक्ष वेधले जात आहे.
युनुस शेख यांना देण्यात आलेल्या नियुक्तीपत्रानुसार, त्यांच्यावर शिवसेना अखिल भारतीय केबल सेना, कळवा-मुंब्रा विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण यांचा प्रचार आणि प्रसार करण्याची अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. तसेच पक्षवाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा विश्वास नियुक्तीपत्रात व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय, त्यांनी प्रत्येक महिन्यात केलेल्या कामाचा लेखी अहवाल बाळासाहेब भवन कार्यालयात सादर करणे आवश्यक असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
