गर्लफ्रेंडच्या भावाला बॉयफ्रेंडने 40 अश्लील फोटो-व्हिडीओ पाठवले, सकाळी दोघांची बॉडी सापडली
MP Crime News : अशोकनगरमध्ये कारमध्ये तरुण-तरुणीचे रक्ताने माखलेले मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांना सुसाइड नोट, धारदार शस्त्र आणि अनेक महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
गर्लफ्रेंडच्या भावाला बॉयफ्रेंडने 40 अश्लील फोटो-व्हिडीओ पाठवले
सकाळी दोघांची बॉडी सापडली
MP Crime News : मध्य प्रदेशातील अशोकनगर जिल्ह्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेनंतर या प्रकरणात नवे आणि हादरवून टाकणारे खुलासे समोर येत आहेत. ईसागढ रोडवरील फुटेरा चक परिसरात एका कारमध्ये तरुण आणि तरुणीचे रक्ताने माखलेले मृतदेह आढळून आले. मृत तरुणीची ओळख 24 वर्षीय मुस्कान जैन, तर तरुणाची ओळख 25 वर्षीय रितिक सोनी अशी झाली आहे.
मुस्कानच्या कुटुंबीयांना दोघांचे अनेक आक्षेपार्ह फोटो पाठवले
प्राथमिक तपासात रितिकने प्रथम मुस्कानची गळा चिरून आणि कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. त्यानंतर त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना घडवण्यापूर्वी रितिकने मुस्कानच्या कुटुंबीयांना दोघांचे अनेक आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर पाठवले होते. पोलिसांना कारमधून दोन पानांचे सुसाइड नोट तसेच विविध शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.
हेही वाचा : केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल, शिंदेंच्या 'त्या' खासदाराला लॉटरी लागणार?
मुस्कानशी संपर्क होत नसल्याने पोलिसांत धाव
माहितीनुसार, मुस्कान बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास घरातून कोणालाही न सांगता बाहेर पडली होती. त्यानंतर रात्री 9.43 वाजता तिच्या चुलत भावाने मोबाईलवरील इंटरनेट सुरू केले असता त्याला व्हॉट्सअॅपवर 50 हून अधिक फोटो आणि तीन व्हिडिओ प्राप्त झाले. हे फोटो आणि व्हिडिओ रितिकने पाठवले होते. त्यामध्ये मुस्कान आणि रितिक एकत्र असल्याचे दिसत होते. हे पाहताच कुटुंबीयांमध्ये एकच खळबळ उडाली. मुस्कानशी संपर्क होत नसल्याने घाबरलेल्या नातेवाईकांनी मध्यरात्रीच्या सुमारास पोलीस ठाण्यात धाव घेत तिच्या बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी रितिकच्या मोबाईलचे लोकेशन शोधण्यास सुरुवात केली. शोधमोहीमेदरम्यान ईसागढ रोडवरील महाना गावाजवळ रस्त्यापासून सुमारे 20 फूट खाली एका खड्ड्यात आय-20 कार आढळून आली. कारचा पुढील भाग पूर्णपणे चुराडा झाला होता आणि हॉर्न सतत वाजत होता. पोलिसांनी कार उघडली असता चालकाच्या सीटवर रितिकचा मृतदेह होता, तर शेजारच्या सीटवर मुस्कानचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळला.









