Crime News : भाच्याचा मामाच्या पोरीवर जीव, विवाह केला अन् मामानं कट रचून...

मुंबई तक

Crime News : भाच्याने मामाच्या पोरीसोबत विवाह केल्याने मामा शहनवाज रागाने लालबुंद झाला. आपली मुलगी आणि भाचा एकमेकांसोबत पळून गेले आहे, या घटनेची त्याला भनक लागली असताच त्याने मोठा कट रचला होता.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

मामाच्या मनात भाच्याबाबत सूडाची भावना

point

कट रचून केला गेम

Crime News : भाच्याने मामाच्या पोरीसोबत विवाह केल्याने मामा शहनवाज रागाने लालबुंद झाला. आपली मुलगी आणि भाचा एकमेकांसोबत पळून गेले आहे, या घटनेची त्याला भनक लागली असताच त्याने मोठा कट रचला होता. मामाला समजले की, भाचा मुसिद शुक्रवारी नोकरीसाठी दिल्लीहून दुबईकडे रवाना होणार होता. आरोपीला अशी भीती होती की, जर मुसिद देश सोडून गेला, तर तो त्याच्या कधीच हाताला सापडणार नाही. दिल्लीला जाण्यापूर्वी त्याने आपल्या पुतण्याच्या हत्येचा मोठा कट रचला आणि त्याला जे हवंय ते साध्य केलं. हा प्रकार उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये घडला आहे. 

हे ही वाचा : आईसोबत अनैतिक संबंधाचा संशय, लेकानं तरुणाला दगडानं ठेचलं

मामाच्या मनात भाच्याबाबत सूडाची भावना

पोलीस तपासातून समोर आले की, मुलीच्या मामा आणि आजोबांच्या कुटुंबाच्या मनात लग्नापासून सूडाची भावना मनात होती. मुसिदने त्यांची फसवणूक करून त्यांच्या मुलीला फसवले, असा मामाला संशय आला होता. लग्नापासूनच त्याच्या मनात हा राग निर्माण झाला होता. पोलिसांनी असा विश्वास व्यक्त केला की, शहनवाझनेच या हत्येचा कट रचला होता, आणि आरोपींचाही यात सहभाग असू शकतो. 

कट रचून केला गेम

तपासातून असे उघडकीस आले की, शहनवाझने हा चाकू उत्तर प्रदेशातील मुझफ्फरपूरनगर येथून आणण्यात आला होता. दिल्लीसारख्या राजधानीत हा गुन्हा करणं इतकं सोपं नव्हत. त्याने भगवानपूरमध्ये हल्ला करण्याचे नियोजन केले होते. भरदिवसा त्या भाच्याला थांबवून त्याची क्रूरपणे हत्या करण्यात आली. अशातच पोलीस मुसिदच्या हत्येच्या प्रत्येक पैलूंचा शोध घेत तपास करत आहेत. 

हे ही वाचा : वऱ्याने बायकोला अश्लील व्हिडिओ दाखवले, नंतर अनैसर्गिक कृत्य केलं अन्..

संबंधित प्रकरणात असा संशय होता की, शहनवाज आणि इतर अनेक जण या कटात होते. जे या कटात सामील होते, त्यांनी मुसिदच्या घरातून निघण्याबाबत आणि चौकात पोहोचण्याबाबत माहिती पुरवली होती. हल्लेखोरांना माहिती होते की, मुसिद हलूमाजरा येथील चौकातून जाणार होता, त्याचवेळी तिथे त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. 

हे वाचलं का?