सोन्यासारख्या बायकोला सोडून मेहुणीच्या प्रेमात पडला, शेवटी भयंकर घटना उघडकीस
नवऱ्याने ओढणीने गळा आवळून आपल्या बायकोची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मेहुणीच्या आणि त्याच्या प्रेमसंबंधाविषयी बायकोला कुणकुण लागली होती. यामुळे दोघांमध्ये भांडण झाले. फरिदाबादमधील ही घटना नेमकी काय आहे, जाणून घेऊया.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सोन्यासारख्या बायकोला सोडून मेहुणीच्या प्रेमात पडला,
शेवटी भयंकर घटना उघडकीस
Crime News : नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मेहुणीसोबत लग्न करण्यासाठी नवऱ्याने बायकोची ओढणीने गळा आवळून हत्या केली. ही घटना 24 जूनच्या मध्यरात्री घडली. हत्या केल्यानंतर आरोपीने पत्नीचा बाथरुममध्ये पाय घसरून पडल्याचा बनाव रचला. त्याने रात्रीच दुसऱ्या खोलीत झोपलेल्या आपल्या आईला उठवून सांगितले की, जोया बाथरुममध्ये पाय घसरून पडली असून तिला उचलून खोलीत आणले आहे. यानंतर कुटुंबीयांच्या मदतीने तो तिला तातडीने रुग्णालयात घेऊन गेला, मात्र तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. हरियाणातील फरिदाबाद परिसरातील ही घटना आहे.
डॉक्टरांना वेगळाच संशय
रुग्णालयात तपासणी दरम्यान डॉक्टरांना मृत महिलेच्या गळ्यावर संशयास्पद खुणा आढळून आल्या. यानंतर डॉक्टरांनी तातडीने स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांना पतीच्या हालचालींवर संशय आल्याने त्यांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरुवातीला अपघाताचा आव आणणाऱ्या पतीची जेव्हा पोलिसांनी कसून चौकशी केली, तेव्हा त्याने आपला गुन्हा कबूल केला.
हे ही वाचा : केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल, शिंदेंच्या 'त्या' खासदाराला लॉटरी लागणार?
तीन वर्षांपूर्वी लग्न
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मृत जोया हिचे लग्न तीन वर्षांपूर्वी ताहिर हुसेनसोबत झाले होते. ताहिर हा ट्रॅक्टर चालवण्याचे काम करतो. या दांपत्याला एक 8 महिन्यांची मुलगी देखील आहे. ताहिर हुसेन हा गेल्या वर्षभरापासून आपल्या मेहुणीच्या संपर्कात होता आणि त्याला तिच्याशी लग्न करायचे होते. मात्र, पत्नी जोयाला या प्रेमसंबंधांची माहिती मिळाली होती. याच कारणावरून पती-पत्नीत जोरदार भांडण झाले आणि संतापलेल्या ताहिरने जोयाचा ओढणीने गळा दाबून तिचा जीव घेतला.
हे ही वाचा : बदलापूर : प्राजक्ता हार्ट अटॅकने गेल्याचा बनाव, 'बाहेरवाली'च्या नादात नवऱ्याचं मोठं कांड
पोलिसांनी काय सांगितले?
पोलिसांनी सांगितले की, आरोपी ताहिर हुसेनने चौकशीदरम्यान आपला गुन्हा पूर्णपणे मान्य केला आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून सर्व पुरावे गोळा केले जात आहेत.









