महाराष्ट्रात घडणार मोठी उलथापालथ?, 'त्या' एका गोष्टीसाठी एकनाथ शिंदे पुन्हा दिल्लीत?

ऋत्विक भालेकर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत जाऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांकडून मिळाली आहे. यावेळी एक अत्यंत महत्त्वाचा अहवाल शिंदे हे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासमोर सादर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

eknath shinde is set to meet with senior bjp central leaders in delhi election report party top brass  possibility he may express dissatisfaction regarding state leadership
एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा
social share
google news

मुंबई: शिवसेना (शिंदे गट)चे प्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज (17 मार्च) दिल्ली दौरा करणार असल्याची माहिती पक्षांतर्गत सूत्रांनी दिली आहे. शिंदे यांच्या या दौऱ्यात भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी (central leadership) थेट चर्चा होण्याची शक्यता आहे. तसंच यावेळी सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह (Bow and Arrow) याबाबतच्या दीर्घकाळ चाललेल्या खटल्याचा आढावा देखील एकनाथ शिंदे घेणार असल्याचे समजते. मात्र, राज्यात नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीची कशी कामगिरी झाली याचा एक अहवाल शिंदेंकडून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला देण्यात येणार असल्याचं समजतं आहे. ज्यामध्ये शिंदे आपली नाराजी व्यक्त करण्याची शक्यता आहे. 

सूत्रांच्या मते, शिंदे यांचा हा दौरा केवळ शिष्टाईसाठी नसून, महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे मजबूत करण्याच्या दृष्टीकोनातून नियोजित आहे. विशेषत: आगामी विधानसभा निवडणुका (२०२७) आणि त्यापूर्वीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अत्यंत रणनीतिक मानला जात आहे.

काल झालेल्या खासदारांच्या बैठकीत पक्षाची भूमिका ठरली

दिल्लीत सुरू असलेल्या केंद्रीय अधिवेशनात (Parliament Session) सहभागी होणाऱ्या शिवसेना (शिंदे गट)च्या सर्व खासदारांची एकनाथ शिंदे यांनी काल (16 मार्च) विशेष बैठक घेतली. या बैठकीत पक्षाची संसदेत नेमकी भूमिका काय असणार याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. 

बैठकीत प्रामुख्याने दोन मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. पहिला मुद्दा म्हणजे सुप्रीम कोर्टातील शिवसेना पक्ष व चिन्ह प्रकरण. शिंदे गटाचे वकील आणि पक्षाचे काही ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. कोर्टात येत्या काही दिवसांत होणाऱ्या सुनावणीची तयारी कशी करायची, यावरही चर्चा झाली. दुसरा महत्वाचा मुद्दा होता – मागील निवडणुकांमधील मित्रपक्षाकडून मिळालेल्या ‘अपूर्ण सहकार्याचा’अहवाल.

हे वाचलं का?

    follow whatsapp