पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर क्रूजरचा टायर फुटून भीषण अपघातात चेंदामेंदा, तिघांचा करुण अंत

मुंबई तक

Pune- Solapur highway Accident : पुणे-सोलापूर राष्ट्रीय राजमार्गावर एक भीषण अपघात झाला. हा अपघात क्रूझर आणि ट्रकदरम्यान झाला होता, या अपघातात क्रूझरमधून प्रवास करणाऱ्या तिघांचा मृत्यू झाला. अपघातात क्रूझरचा टायर फाटला आणि वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने क्रूझर गाडी ही एका ट्रकवर आदळली आणि याच क्रूझरचा चेंदामेंदा झाला. 

ADVERTISEMENT

Pune- Solapur highway Accident
Pune- Solapur highway Accident
social share
google news

बातम्या हायलाइट

point

क्रूझरचा टायर फुटून तिघांचा दुर्दैवी मृत्यू 

point

मृत्यू झालेले तिघेजण एमआयडीसीतील नोकरदार 

Pune- Solapur highway Accident : पुणे-सोलापूर राष्ट्रीय राजमार्गावर एक भीषण अपघात झाला. हा अपघात क्रूझर आणि ट्रकदरम्यान झाला होता, या अपघातात क्रूझरमधून प्रवास करणाऱ्या तिघांचा मृत्यू झाला. अपघातात क्रूझरचा टायर फाटला आणि वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने क्रूझर गाडी ही एका ट्रकवर आदळली आणि याच क्रूझरचा चेंदामेंदा झाला. 

हे ही वाचा : भिवंडीतील 15 वर्षीय आदिवासी मुलीचे अपहरण, लग्नाचे आमिष दाखवत बीडमधील वृद्धाला विकले, नंतर शेतात नको तेच...

क्रूझरचा टायर फुटून तिघांचा दुर्दैवी मृत्यू 

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापुर तालुक्यातील लोणी देवकर परिसरात ही दुर्दैवी घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातादरम्यान क्रूझरचा टायर फाटला आणि एका ट्रकवर जाऊन क्रूझर आदळली होती. याच अपघातात क्रूझरमधून प्रवास करणाऱ्या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.  

मृत्यू झालेले तिघेजण लोणी देवकर एमआयडीसीतील नोकरदार 

सांगण्यात येतंय की, अपघातात मृत्यू झालेले तिघेजण हे लोणी देवकर एमआयडीसीमध्ये काम करत होते. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. या अपघातामुळे प्रवास ठप्प झाला होता, पण पोलिसांमुळे वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला होता. 

हे ही वाचा : भाजप नगरसेविकेची गुंडगिरी! बोरिवलीत एका खासगी दुकानात घुसून तोडफोड, मंदिराची विटंबना केल्याचा आरोप

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही प्रवासी हे क्रूझर कारमध्ये बसलेले होते. याचदरम्यान अचानक क्रूझरचा टायर फुटला आणि कार रोड डिवाइडरवर आदळली होती. दुसरीकडे ट्रकवर आदळली. या गंभीर अपघातात क्रूझरच्या चालकासह तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.

हे वाचलं का?

    follow whatsapp