कल्याण-डोंबिवलीत राजकीय भूकंप! ठाकरे गटाच्या नगरसेवकाचा शिंदेसेनेत प्रवेश; पोटनिवडणूक होण्याची शक्यता
KDMC News : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला. ठाकरे गटाने शिस्तभंगाची कारवाई करत नगरसेवक मधुर म्हात्रे यांची पक्षातून हकालपट्टी केली. या कारवाईनंतर अवघ्या काही तासांतच म्हात्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला. केडीएमसीच्या सत्तासमीकरणावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कल्याण-डोंबिवलीत राजकीय भूकंप!
ठाकरे गटाच्या नगरसेवकाचा शिंदेसेनेत प्रवेश
पोटनिवडणूक होण्याची शक्यता
KDMC News : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला. ठाकरे गटाने शिस्तभंगाची कारवाई करत नगरसेवक मधुर म्हात्रे यांची पक्षातून हकालपट्टी केली. या कारवाईनंतर अवघ्या काही तासांतच म्हात्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला. केडीएमसीच्या सत्तासमीकरणावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा : महाराष्ट्रात घडणार मोठी उलथापालथ?, 'त्या' एका गोष्टीसाठी एकनाथ शिंदे पुन्हा दिल्लीत?
नोटीशीला समाधानकारक उत्तर नाही
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे गटाचे 11 नगरसेवक निवडून आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे, राहुल कोट आणि स्वप्नाली केणे हे चार नगरसेवक संपर्काबाहेर असल्याने पक्षात अस्वस्थता निर्माण झाली होती. हे चारही नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. या पार्श्वभूमीवर पक्षाचे सचिव वरुण सरदेसाई यांनी संबंधित नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने मधुर म्हात्रे यांची हकालपट्टी करण्यात आली.
हकालपट्टीचे पत्र मिळताच एकनाथ शिंदेंची भेट
हकालपट्टीचे पत्र मिळताच मधुर म्हात्रे यांनी तात्काळ एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि आमदार राजेश मोरे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. हिंदुत्वाचा विचार आणि विकासकामांना चालना देण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.