गैंरो पे करम, अपनों पे सितम! राज्यसभा निवडणुकीत क्रॉस वोटिंग, आमदारांनी गद्दारी केल्याने काँग्रेसची फजिती!
Rajya Sabha Election 2026 : 16 मार्च रोजी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झालेले पाहायला मिळाले. शिवाय आमदारांचे गायब होणे किंवा मतदानापासून दूर राहिल्याने बाजी पलटली. हरियाणामध्ये काँग्रेसच्या दोन आमदारांच्या मतांवर भाजपने घेतलेल्या आक्षेपामुळे मतमोजणी उशिरा सुरू झाली, तर बिहारमध्ये भाजपने विधानसभा निवडणुकीप्रमाणेच 'क्लीन स्वीप' दिला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
गैंरो पे करम, अपनो पे सितम! राज्यसभा निवडणुकीत क्रॉस वोटिंग
आमदारांनी गद्दारी केल्याने काँग्रेसची फजिती!
Rajya Sabha Election 2026 : राज्यसभेच्या 37 जागांपैकी बिहार, हरियाणा आणि ओडिशामधील केवळ 11 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. कारण 26 जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. तरीही, या तीन राज्यांमध्ये अशा काही घडामोडी घडल्या ज्यामुळे अनेक उमेदवारांना विजय निश्चित वाटत असताना पराभवाला सामोरे जावे लागले. यात बिहारमधील क्रॉस वोटिंग सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली.
ज्या 11 जागांवर निवडणूक झाली, त्यापैकी 9 जागांवर NDA (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) किंवा एनडीए समर्थित उमेदवारांनी विजय मिळवला आहे. उर्वरित दोन जागांपैकी एक काँग्रेस आणि एक BJD च्या वाट्याला आली आहे. काँग्रेसला जवळपास सर्वच ठिकाणी स्वतःच्या आमदारांनी दगा दिला असून, बिहारमध्ये पक्षाची सर्वाधिक नाचक्की झाली आहे.
बिहारमध्ये तेजस्वी यादव यांनी बसप (BSP) नेत्या मायावती आणि एआयएमआयएम (AIMIM) नेते असदुद्दीन ओवैसी यांचा पाठिंबा मिळवला होता, परंतु काँग्रेस अन् आरजेडीच्या एका आमदाराने ऐनवेळी दगा दिल्याने त्यांचे गणित बिघडले.
कुठे-कुठे झाली क्रॉस व्होटिंग?
16 मार्च रोजी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झालेले पाहायला मिळाले. शिवाय आमदारांचे गायब होणे किंवा मतदानापासून दूर राहिल्याने बाजी पलटली. हरियाणामध्ये काँग्रेसच्या दोन आमदारांच्या मतांवर भाजपने घेतलेल्या आक्षेपामुळे मतमोजणी उशिरा सुरू झाली, तर बिहारमध्ये भाजपने विधानसभा निवडणुकीप्रमाणेच 'क्लीन स्वीप' दिला.










