भयंकर.. ICU मध्ये उंदीर चावला, महिलेचा काही तासात मृत्यू.. हादरवून टाकणारी घटना

मुंबई तक

भाईंदरमधील शासकीय रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू असलेल्या एका वृद्ध महिलेला त्याच वॉर्डमध्ये उंदीर चावल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ADVERTISEMENT

rat bites woman in icu she Dies within hours shocking incident in bhayandar
(प्रातिनिधिक फोटो)
social share
google news

प्रविण नलावडे, भाईंदर: भाईंदरमध्ये शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात (ICU) उपचार घेत असलेल्या 89 वर्षीय वृद्ध महिलेला उंदराने कुरतडल्याने तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. या प्रकरणी वृद्ध महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले असून रुग्णालय प्रशासनावर कारवाईची मागणी केली आहे. 

नेमकी घटना काय?

भाईंदर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या एका वृद्ध महिलेला उंदराने चावा घेतल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सुहासिनी माठेकर (वय 89) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांना 12 मार्च रोजी भाईंदर पश्चिम येथील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

हे ही वाचा>> पुणे - कुख्यात गुंड निलेश घायवाळला कानशि‍लात लगावणाऱ्या पैलवानाचा पुण्यात मृत्यू, एका आरोपीच्या आवळल्या मुसक्या

त्यांच्या प्रकृतीची स्थिती गंभीर असल्याने त्यांच्यावर चौथ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर उपचार सुरू होते. नातेवाईकांच्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास आयसीयूमध्ये उंदराने त्यांच्या हाताला कुरतडल्याची घटना घडली. सोमवारी सकाळी सुमारे सहा वाजता नातेवाईक त्यांना पाहण्यासाठी आयसीयूमध्ये गेले असता हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यावेळी महिलेच्या उजव्या हाताला गंभीर जखम झालेली होती आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. उंदीर तिथून पळून गेल्याचेही नातेवाईकांनी सांगितले.

हे ही वाचा>> मुलाला अ‍ॅक्टर आणि आईला राज्यपाल बनवतो, बड्या नेत्याशी जवळीक असल्याचे भासवून मोठं कांड

जखमेमुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने दुपारपर्यंत महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. रात्रीच्या वेळी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर किंवा परिचारिकांच्या लक्षात हा प्रकार कसा आला नाही? असा सवालही नातेवाईकांकडून उपस्थित करण्यात आला आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp