पुणे - कुख्यात गुंड निलेश घायवाळला कानशिलात लगावणाऱ्या पैलवानाचा पुण्यात मृत्यू, एका आरोपीच्या आवळल्या मुसक्या
Pune Crime : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवाळला कानशिलात लगावणारा पैलवान सागर मोहोळकरचा पुण्यात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. 9 मार्च रोजी जामखेडमध्ये सागर मोहोळकरवर गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारानंतर तो गंभीर जखमी झाला, त्यानंतर त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
निलेश घायवाळला कानशिलात लगावणारा पैलवान सागर मोहोळकर मृत्यू
पैलवान सागर मोहोळकरवर गोळीबार
Pune Crime : आदित्य भावार - पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवाळला कानशिलात लगावणारा पैलवान सागर मोहोळकरचा पुण्यात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. 9 मार्च रोजी जामखेडमध्ये सागर मोहोळकरवर गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारानंतर तो गंभीर जखमी झाला, त्यानंतर त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
हे ही वाचा : 'बारामतीत सुनेत्रा पवारांविरोधात..', सुप्रिया सुळेंची मोठी घोषणा; राहुरीच्या पोट-निवडणुकीबाबतही भाष्य
पैलवान सागर मोहोळकरवर गोळीबार
सागर मोहोळकरने जामखेड येथे कुख्यात गुंड निलेश घायवाळच्या कानशिलात लगावली होती. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अहिल्यानगरच्या जमाखेडमध्ये पैलवान सागर मोहोळकरवर गोळीबार झाल्याची घटना 9 मार्च रोजी घडली होती.
मोहोळकरवर गोळीबार झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाल्याचं चित्र आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकाला पुण्यातून ताब्यात घेण्यात आलं. आरोपी हा सध्या पुण्याचाच रहिवासी आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
हे ही वाचा : नागपूर हादरलं! पेपरचं कारण देऊन मुलगा घरातून निघाला, एम्प्रेस मॉलच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारत संपवलं जीवन
पैलवान सागर मोहोळकरवर फायरिंग करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलं. संबंधित प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेला आरोपी पुण्याचा असून त्याची कसून चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.










