'चर्चजवळच्या खोलीत नेलं अन्...' पाच अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण, ख्रिश्चन धर्मगुरुला अटक

एका स्वयंसेवी संस्थेने अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केल्यानंतर मंगळूरू येथील एका ख्रिश्चन धर्मगुरुला अटक करण्यात आली. कर्नाटकातील मंगळूरमधील ही घटना आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

पाच अल्पवयीन मुलांचं लैंगिक शोषण

point

ख्रिश्चन धर्मगुरुला अटक

point

एनजीओमुळे प्रकरण उघडकीस

Crime News : कर्नाटक राज्यातील मंगळूरमधील एका चर्चशी संबंधित धर्मगुरूने अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. 'प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया' (PTI) या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, म्हैसूरस्थित एका स्वयंसेवी संस्थेच्या (एनजीओ) हस्तक्षेपानांतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पाच मुलांचे लैंगिक शोषण

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, किमान पाच मुलांचे लैंगिक शोषण झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. फादर सिप्रियन पिंटो असे या प्रकरणातील आरोपीचे नाव असून, तो 1988 पासून सेवेत होता आणि मंगळूरमधील व्हॅलेन्शिया येथील सेंट व्हिन्सेंट फेरर चर्चशी संबंधित होता. 'ओडानाडी' या एनजीओने ही बाब मंगळूरचे पोलीस आयुक्त सुधीर कुमार रेड्डी यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पोलिसांनी पीडित मुलांची भेट घेऊन त्यांच्याकडून औपचारिक तक्रार नोंदवून घेतली, असे पीटीआयने म्हटले आहे.

हे ही वाचा : "डरपोक लोकं, कुठेतरी लपून बसतात..", टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर मुख्यमंत्री काय म्हणाले?

चॉकलेटचे अमिष दाखवले अन्...

तक्रारीत नमूद केलेल्या घटनेनुसार, आरोपीने एका अल्पवयीन मुलाला चॉकलेटचे आमिष दाखवून अयोग्य शेरेबाजी केली आणि त्याला चर्चच्या बाजीला असलेल्या खोलीजवळ नेले. याशिवाय, 14 ऑगस्ट रोजी प्रार्थनेविषयी चर्चेसाठी आलेल्या एका अल्पवयीनाला रिसेप्शनिस्टच्या खोलीत नेऊन गैरवर्तन करण्यात आल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

हे ही वाचा : टायगर श्रॉफवर हल्ला करणारे आरोपी अल्पवयीन? देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलं?

'असं' बाहेर आलं प्रकरण

ओडानाडीचे सह-संस्थापक के. व्ही. स्टॅन्ले यांनी आरोप केला आहे की, हा प्रकार सर्वप्रथम ऑगस्टमध्ये मंगळूर धर्मप्रांताच्या (डायोसिज) निदर्शनास आणून देण्यात आला होता; परंतु योग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याऐवजी त्यांनी अंतर्गत चौकशी समिती स्थापन करून आरोपीला सक्तीच्या रजेवर पाठवले. पालकांनी बाल संरक्षण अधिकाऱ्यांना पत्र पाठवूनही तात्काळ कारवाई न झाल्याने त्यांनी एनजीओशी संपर्क साधला, ज्याच्या हस्तक्षेपावरून पोलिसांनी एफआयआर नोंदवून आरोपीला त्याच्या नातेवाईकाच्या घरातून रविवारी अटक केली.