बीड : पतीने मोबाईल घेऊन दिला नाही; साडेतीन वर्षांच्या मुलासह आईची विहिरीत उडी, दोघांचाही करुण अंत

मुंबई तक

Beed Crime News : प्राजक्ता ही मागील काही दिवसांपासून पतीकडे नवीन मोबाईलची मागणी करत होती. मात्र, रामेश्वर बाबासाहेब दराडे यांनी मोबाईल घेऊन न दिल्याने त्यांच्यात वाद झाले होते. याच कारणावरून आलेल्य संतापाच्या भरात प्राजक्ताने आपल्या चिमुकल्या मुलासह विहिरीत उडी घेतली. या घटनेत मायलेकाचा बुडून मृत्यू झाला.

ADVERTISEMENT

Beed Crime News
Beed Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पतीने मोबाईल घेऊन दिला नाही

point

साडेतीन वर्षांच्या मुलासह आईची विहिरीत उडी, दोघांचाही करुण अंत

Beed Crime News : रोहिदास हातागळे/बीड: पतीने मोबाईल घेऊन दिला नाही या रागातून एका 24 वर्षीय महिलेने आपल्या साडेतीन वर्षांच्या चिमुरड्या मुलासह विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड तालुक्यातील लिंबारूई शिवारात घडलेल्या या हृदयद्रावक घटनेत मायलेकाचा जागीच मृत्यू झाला असून, या प्रकरणी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राजक्ता उर्फ राधा रामेश्वर दराडे (वय २४ वर्ष, रा. लिंबारूई, ता. जि. बीड) असे मृत महिलेचे नाव असून, तिने आपला मुलगा वेदांत (वय 3 वर्षे 5 महिने) याच्यासह हे टोकाचे पाऊल उचलले. 

हेही वाचा : मोठी बातमी: NCP च्या राष्ट्रीय अध्यक्षाचं नाव ठरलं, प्रफुल पटेल नाही तर कोकाटेंनी केली 'यांच्या' नावाची घोषणा

मिळालेल्या माहितीनुसार, प्राजक्ता ही मागील काही दिवसांपासून पतीकडे नवीन मोबाईलची मागणी करत होती. मात्र, रामेश्वर बाबासाहेब दराडे यांनी मोबाईल घेऊन न दिल्याने त्यांच्यात वाद झाले होते. याच कारणावरून आलेल्य संतापाच्या भरात प्राजक्ताने आपल्या चिमुकल्या मुलासह विहिरीत उडी घेतली. या घटनेत मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना 31 डिसेंबर 2025 रोजी घडली होती. सुरुवातीला या प्रकरणाची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. मात्र, पोलीस चौकशी दरम्यान धक्कादायक वास्तव समोर आले. फिर्यादी रामेश्वर दराडे यांनी दिलेल्या पुरवणी जबाबानुसार, 31 जानेवारी 2026 रोजी या घटनेचा सविस्तर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चिमुरड्या वेदांतचा पाण्यात बुडवून खून केल्याप्रकरणी मयत प्राजक्ता हिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज करत आहेत. एका क्षुल्लक कारणावरून दोन जीवांचा असा अंत झाल्याने लिंबारूई परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

हे वाचलं का?

    follow whatsapp