मोठी बातमी: NCP च्या राष्ट्रीय अध्यक्षाचं नाव ठरलं, प्रफुल पटेल नाही तर कोकाटेंनी केली 'यांच्या' नावाची घोषणा
राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार हे आता स्पष्ट झालं आहे. प्रफुल पटेल हे राष्ट्रीय अध्यक्ष बनणार नसल्याचंही आता समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP)राष्टीय अध्यक्षपदी प्रफुल पटेल यांची नियुक्ती झाली आहे. असं विधान भाजपचे मंत्री पियुष गोयल यांनी केलं होतं. ज्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. यावर स्वत: प्रफुल पटेल यांनी ट्वीट करत स्पष्टीकरण दिलं की, असा कोणत्याही स्वरूपाचा निर्णय झालेल नाही. याविषयी पक्ष चर्चा करून निर्णय घेईल असं ते म्हणाले होते. पण यानंतर अवघ्या काही वेळात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव कोकाटे यांनी एक अत्यंत महत्त्वाचं विधान माध्यमांशी बोलताना केलं आहे.
पक्षातील विलिनीकरणाच्या कोणत्याही चर्चेबाबत आपल्याला माहिती नसल्याचे सांगत त्यांनी सुनेत्रा पवार यांचा निर्णय पक्षासाठी अंतिम असल्याचे स्पष्ट केले. सुनेत्रा पवार ह्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा राहणार असून, त्यांच्याशिवाय दुसरा कोणीही राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. त्यांच्या याच विधानामुळे आता हे स्पष्ट झालं की, प्रफुल पटेल हे NCP चे राष्ट्रीय अध्यक्ष बनणार नाहीत.
पाहा माणिकराव कोकाटे नेमकं काय-काय म्हणाले...
'विलिनीकरणाबाबत वहिनी जो काही निर्णय घेतील तो आम्ही मान्य करू'
माणिकराव कोकाटे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, "विलिनीकरणाबाबत काय चर्चा झाल्या या आम्हाला माहीत नाही. जोपर्यंत आमची चर्चा त्यांच्या कुटुंबासोबत किंवा इतर नेत्यांसोबत होत नाही तोवर विलिनीकरणाबाबत बोलणं योग्य ठरणार नाही. ती जी चर्चा आहे ती वहिनींसोबत दादांनी केली असेल. आता वहिनींसोबत आम्ही कोणीही चर्चा करू शकलो नाही. त्यामुळे आम्हाला काही त्या गोष्टीबाबत सांगता येणार नाही. कौटुंबिक प्रश्न आहे. त्यात वहिनी बसून चर्चा करतील. वहिनींनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असेल."
हे ही वाचा>> 'प्रफुल पटेलांची NCP चे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालीए', भाजपच्या मोठ्या मंत्र्याने केली थेट घोषणा.. महाराष्ट्रात उडाली गडबड!
पक्षातील विलिनीकरणाच्या चर्चा फक्त सुनेत्रा पवार (वहिनी) यांच्याशीच होणार असून, त्या पक्षाच्या अध्यक्षा आणि नेत्या असल्याने त्यांचा निर्णय पक्षातील सर्व पदाधिकारी आणि आमदार मान्य करतील, असे कोकाटे यांनी पुढे सांगितले. "जो काही निर्णय असेल तो वहिनी घेतील. आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि विधिमंडळाच्या आमदारांना वहिनींनी घेतलेला निर्णय मान्य असेल. दादांची जर वहिनींसोबत चर्चा झाली असेल तर ती फक्त वहिनींना माहिती असेल. आम्हाला कोणालाही माहिती नाही आणि आम्ही कोणी त्यात सहभागी नव्हतो. त्यामुळे आम्ही त्यावर भाष्य करू इच्छित नाही," असे ते म्हणाले.










