नात्याला काळिमा! काकाने 6 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप

Crime News : नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 6 वर्षाच्या चिमुरडीवर तिच्याच काकाने लैंगिक अत्याचार केला आणि हत्या केल्याची दुर्दैवी घटना आहे. आई-वडिलांनी मुलीला काकाकडे सोडलं आणि ते दोघेही कामासंबंधी बाहेर गेले असताना लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

ADVERTISEMENT

crime news
crime news
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस

point

6 वर्षाच्या चिमुरडीवर तिच्याच काकाने लैंगिक अत्याचार केला

Crime News : नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 6 वर्षाच्या चिमुरडीवर तिच्याच काकाने लैंगिक अत्याचार केला आणि हत्या केल्याची दुर्दैवी घटना आहे. आई-वडिलांनी मुलीला काकाकडे सोडलं आणि ते दोघेही कामासंबंधी बाहेर गेले होते. आरोप असा की, काकाने मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. या घटनेनंतर पीडितेची प्रकृती अगदीच गंभीर आहे. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असलेल्या तिच्या कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले, जिथे प्राथमिक उपचारानंतर तिची प्रकृती गंभीर झाल्याने तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. ही घटना राजस्थानातील सिरोही जिल्ह्यातील शिवगंज परिसरातील आहे.

हे ही वाचा : नऊ महिन्यांच्या बाळाची बापानं केली हत्या, संशय येऊ नये म्हणून पुरलं

6 वर्षांच्या मुलीवर काकाकडून लैंगिक अत्याचार 

संबंधित प्रकरणात मुलीचे आईवडील काही कामासाठी बाहेर गेले होते आणि तिला तिच्या काकांकडे सोडले होते. या प्रकरणात आरोप केला की, याच वेळी आरोपीला मुलगी एकटीच आढळून आली आणि त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर मुलीची प्रकृती अधिकच खालावली होती. तिच्या कुटुंबीयांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. तिची गंभीर परिस्थितीत पाहून रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले होते. 

आरोपी काकाविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा

घडलेल्या घटनेनुसार, शिवगंज रुग्णालयात सर्जन उपलब्ध नसल्याने, मुलीची प्रकृती अधिकच गंभीर असल्याने सिरोही येथे पाठवण्यात आले होते. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी आरोपी काकाविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे ही वाचा : धाराशिव: 6 जणांचा अंत, अग्निशमन विभागाचा निष्काळजीपणा समोर

या प्रकरणात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार आरोपीची चौकशी सुरू करण्यात आली. पोलिसांनी घटनेशी संबंधित माहिती गोळा करत आहेत.