नवरा गावी गेला अन् बायको बॉयफ्रेंडसोबत खोलीत...
Crime News : फेसबुकवरून सुरू झालेल्या मैत्रीचे रुपांतर हे प्रेमप्रकरणात झाले आणि त्यानंतर झालेल्या वादानंतर त्याचा रक्तरंजित शेवट झाला, असा आरोप करण्यात आला. महिलेनं बैठकीसाठी खोलीत बोलावण्यात आले होते, जिथे वाद झाल्यानंतर तिच्या डोक्यात विटेनं हल्ला केला होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
रागाच्या भरात पिंकीच्या डोक्यात विटेने हल्ला
हल्ल्यात गंभीर जखमांमुळे जागीच मृत्यू
Crime News : फेसबुकवरून सुरू झालेल्या मैत्रीचे रुपांतर हे प्रेमप्रकरणात झाले आणि त्यानंतर झालेल्या वादानंतर त्याचा रक्तरंजित शेवट झाला, असा आरोप करण्यात आला. महिलेनं बैठकीसाठी खोलीत बोलावण्यात आले होते, जिथे वाद झाल्यानंतर तिच्या डोक्यात विटेनं हल्ला केला होता. घटनेनंतर आरोपीचा एक मित्र खोलीत उपस्थित होता. पोलिसांनी दोन्ही पुरुषांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली. महिलेच्या डोक्यावर गंभीर जखमा आढळून आल्या आहेत. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. गाझियाबादच्या लोणी बॉर्डर पोलीस ठाणे परिसरातील इंद्रायणी येथील हे प्रकरण उघडकीस आले.
हे ही वाचा : कल्याणमध्ये घटनेचा थरार, दुचाकीतून पेट्रोलची गळती; फटाक्याच्या ठिणगीनं घेतला पेट
मृत महिलेची पिंकी (वय 28) अशी ओळख समोर आली. ती बुलंदशहरच्या अनुपशहर पोलीस ठाणे परिसरातील रहिवासी आहे. ती तिचा पती प्रमोद आणि दोन मुलांसोबत लोणी येथील इंद्रपुरी नं. 2 मधील नीलम फॅक्टरी रोडवरील एका भाडेतत्वावर राहत होती. तिचा पती कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मजुरीचे काम करतो. प्रमोद एका सणासाठी बुलंदशहरमधील त्याच्या गावी गेला होता. सोमवरी रात्री उशिरा पिंकीची हत्या करण्यात आली.
रागाच्या भरात पिंकीच्या डोक्यात विटेने हल्ला
घडलेल्या घटनेनुसार, पिंकी ही तिचा प्रियकर पिंटूला भेटण्यासाठी पिंटूचा मित्र आर्यनच्या खोलीत गेली होती. सुरुवातीला ते तिघेही एकत्र बसून दारू प्यायले होते. त्यानंतर पिंटू आणि पिंकीत वाद निर्माण झाला. रागाच्या भरात पिंकीच्या डोक्यात विटेने हल्ला केला, ज्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी पिंटू आणि मित्र आर्यन यांना ताब्यात घेतले.
हल्ल्यात गंभीर जखमांमुळे जागीच मृत्यू
पिंटू आणि मित्राने प्रेयसी पिंकीच्या घराशेजारी एक खोली भाड्याने घेतली होती. ते तिथे सुमारे 4 दिवसांपासून राहत होते, जिथे काल पिंकी त्यांना भेटल्यानंतर, जेव्हा वाद विकोलापा गेला असता, पिंटूने जवळच ठेवलेल्या विटेनं पिंकीच्या डोक्याला प्रहार केला. या हल्ल्यात गंभीर जखमांमुळे तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेदरम्यान खोलीतून किंकाळ्या ऐकून, जवळच्या लोकांना काहीतरी अनुचित घडल्याची भीती वाटली. शेजाऱ्यांनी पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांना सोमवारी रात्री 8:54 वाजता घटनेची माहिती दिली.
हे ही वाचा : Astrology : पुढच्या दिवाळीपर्यंत तुमचे आर्थिक भविष्य काय असेल? जाणून घ्या 12 राशींचे भविष्य
माहिती मिळताच, लोणी बॉर्डर पोलीस स्टेशनचे पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थली दाखल झाले. त्यानंतर पिंकींचा मृतदेह खोलीतील जमिनीवर आढळून आला होता. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता, पोलिसांचे पथक आले आणि त्यांनी पुरावे गोळा केले. त्यानंतर दोघांना ताब्यात घेण्यात आले असून प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे.
