Maharashtra weather : वातावरणात बदल, रात्री गारवा अन् दिवसा उष्णता; हवामान खात्याचा अंदाज

Maharashtra Weather : राज्यातील सध्याच्या हवामानात चढ- उतार पाहायला मिळत आहे. रात्री आणि दिवसा वातावरणात बदल घडून येण्याची शक्यता आहे. अशातच आता राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे, तसेच रात्री गारवा आणि सकाळी उष्णतेचा अंदाज आहे.

ADVERTISEMENT

Maharashtra Weather
Maharashtra Weather
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

राज्यातील सध्याच्या हवामानात चढ- उतार

point

दिवसा उष्ण आणि रात्री काही प्रमाणात गारवा

Maharashtra Weather : राज्यातील सध्याच्या हवामानात चढ- उतार पाहायला मिळत आहे. रात्री आणि दिवसा वातावरणात बदल घडून येण्याची शक्यता आहे. अशातच आता राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. तसेच काही बागांत कलमान तामानात काही अंशी वाढ होण्याची शक्यता आहे, तर किमान तपमानात घट होण्याची शक्यता आहे. दिवसा उष्ण आणि रात्री काही प्रमाणात गारवा जाणवण्याची शक्यता आहे. 

हे ही वाचा : नात्याला काळिमा! काकाने 6 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप

कोकण 

कोकणात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. रात्री आणि पहाटे हवेत गारवा जाणवेल, तर दिवसा उष्णता जाणवेल. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत हवामान प्रामुख्याने कोरडं राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी दिवसा तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. रात्री तापमानात घट होऊन थंडीत वाढ होईल. 

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहिल्यानगर  या जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडं हवामानाची शक्यता आहे. या भागात दिवसाच्या तपामानात फारसा बदल अपेक्षित नसला तरीही रात्रीच्या वेळी आणि पहाटे गारवा वाढण्याची शक्यता आहे. 

मराठवाडा 

मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली या आठही जिल्ह्यांत हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. याच भागात दिवसा उन्हाची तीव्रता जाणवेल. तसेच रात्री आणि पहाटे तापमानात घट होऊन थंडावा जाणवेल. 

हे ही वाचा : नऊ महिन्यांच्या बाळाची बापानं केली हत्या, संशय येऊ नये म्हणून पुरलं

विदर्भ 

विदर्भात नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. तसेच काही भागांत तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याचा अंदाज आहे. मात्र, रात्री तापमानात काही प्रमाणात घट कायम राहील आणि रात्रीच्या वेळी थंडावा जाणवेल.