पार्थ पवार भेटायला आल्यानंतर काय म्हणाले? विलीनीकरणाबाबत चर्चा झाली का? शरद पवारांनी सगळं सांगितलं!
Sharad Pawar on Parth Pawar : शरद पवार यांनी स्पष्ट केले की, पार्थ पवार हे त्यांची भेट घेण्यासाठी आले होते. मात्र ही भेट केवळ अजित पवार यांच्या स्मारकाच्या उभारणीसंदर्भातील चर्चेसाठी होती. या भेटीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या एकत्रीकरणाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पार्थ पवार भेटायला आल्यानंतर काय काय म्हणाले?
शरद पवारांनी सगळं सांगितलं!
Sharad Pawar on Parth Pawar , मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी विमान दुर्घटनेत निधन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून राज्यात वेगवान राजकीय घडामोडी घडू लागल्या. अजितदादांच्या निधनांनंतर तिसऱ्याच दिवशी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर दुसरीकडे सूनेत्रा पवारांच्या शपथविधीला अनुपस्थितीत असलेल्या पार्थ पवारांनी त्याच दिवशी दुपारी खासदार शरद पवार यांची भेट घेतली होती. दरम्यान, या भेटीदरम्यान दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा झाली का? पार्थ पवार कोणत्या विषयावर बोलण्यासाठी आले होते? याबाबत स्वत: शरद पवार यांनी ऑफ रेकॉर्ड माहिती दिली आहे.
शरद पवार यांनी स्पष्ट केले की, पार्थ पवार हे त्यांची भेट घेण्यासाठी आले होते. मात्र ही भेट केवळ अजित पवार यांच्या स्मारकाच्या उभारणीसंदर्भातील चर्चेसाठी होती. या भेटीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या एकत्रीकरणाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
सूनेत्रा पवारांबाबत शरद पवारांचं भाष्य
यावेळी शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबतही भूमिका मांडली. सुनेत्रा पवार यांनी पुढील काळात बारामती आणि महाराष्ट्रात राहूनच काम करणे आवश्यक आहे, असे त्यांनी म्हटले. तसेच त्या आता राज्यसभा सदस्य नसल्यामुळे संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होणार नसल्याचेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.










