वसईतील बंद पाण्याच्या टाकीत मानवी सांगाडा अन् कवटी आढळली, घातपात की आणखी काय?

मुंबई तक

Vasai News : वसईत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. माणिकपूर पोलीस ठाणे नौपाडा परिसरात एका पाण्याच्या टाकीमध्ये मानवी शरीराचे अवशेष आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. हा धक्कादायक प्रकार नौपाडा येथील बारकुल्या नावाच्या चाळीत शनिवारी सायंकाळी घडल्याचं चित्र आहे.

ADVERTISEMENT

vasai news
vasai news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मानवी हाडांचा सांगाडा, कवटी टाकीत आढळली 

point

सांगाड्याचे काही तुकडे शोधण्याचे काम सुरु

Vasai News : वसईत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. माणिकपूर पोलीस ठाणे नौपाडा परिसरात एका पाण्याच्या टाकीमध्ये मानवी शरीराचे अवशेष आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. हा धक्कादायक प्रकार नौपाडा येथील बारकुल्या नावाच्या चाळीत शनिवारी सायंकाळी घडल्याचं चित्र आहे. घटनेची माहिती मिळताच माणिकपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोध घेण्यास सुरुवात केली. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. 

हे ही वाचा : पत्नीचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर, पुतण्यासोबत शरीरसंबंध, 'तसले' कृत्य करताना नवऱ्याचा काटा काढला

मानवी हाडांचा सांगाडा, कवटी टाकीत आढळली 

दरम्यान, हि चाळ सुमारे तीस वर्षे जुनी आहे. याच चाळीत सुमारे दहा ते पंधरा कुटुंब वास्तव्यास आहेत. या चाळातील बंद पाण्याची टाकी अनेक वर्षांपासून वापरात आली नव्हती. इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरु असताना पाण्याची टाकी तोडण्याचे काम सुरु होते, त्याचवेळी मानवी हाडांचा सांगाडा, कवटी त्या टाकीत आढळून आला होता. 

सांगाड्याचे काही तुकडे शोधण्याचे काम सुरु

या प्रकरणात माणिकपूर पोलिसांना घटनास्थळी बोलवण्यात आलं. पोलिसांनी फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी प्राचारण करण्यात आले होते. त्याच सांगाड्याचे इतर काही तुकडे शोधण्याचे काम पोलिसांना करावं लागत आहे. काहींनी अंधश्रद्धेचा अंदाज असल्याचं वक्तव्य केलं होतं. तर काहींनी खून करून मृतदेह टाकीत ठेवल्याचा देखील अंदाज बांधला. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाल्याचं चित्र आहे. या प्रकरणात नेमकं काय सत्य समोर येईल पोलीस त्याचा तपास करत आहेत. 

हे ही वाचा : 'प्रफुल पटेलांची NCP चे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालीए', भाजपच्या मोठ्या मंत्र्याने केली थेट घोषणा.. महाराष्ट्रात उडाली गडबड!

घटनास्थळी शरीराचे पूर्ण अवशेष नसल्याने हा खून आहे की, आणखी काही असा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याचं वृत्त आहे. या घटनेनं घटनास्थळ हादरून गेला आहे. पोलीस पुरेपूर तपास करून घटनेचा छडा लावतील. 

हे वाचलं का?

    follow whatsapp