'...नाहीतर मीही अनेक गोष्टी सांगू शकतो', 'त्या' विधानाने मोठी खळबळ.. NCP विलिनीकरणावर CM फडणवीस असं का म्हणाले?
विलिनीकरणाबाबत अजित पवारांनी भाजपशी चर्चा केल्याशिवाय निर्णय घेतला नसता. सध्याच्या परिस्थितीत आम्हाला राजकारण करायचं नाही. पण काय घडतंय हे मला व्यवस्थित माहिती आहे. असं मोठं विधान मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांनी केलं आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चांबाबत स्पष्ट भूमिका घेतली आहे. NCP हा स्वतंत्र पक्ष असून, त्यांच्या अंतर्गत निर्णयांमध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही, असे सांगत त्यांनी विलिनीकरणाबाबतचे सर्व निर्णय NCP चे असल्याचे नमूद केले. तथापि, NCP ने घेतलेल्या कोणत्याही निर्णयाच्या पाठीशी महायुती उभी राहील, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. पण याचवेळी फडणवीस असंही म्हणाले की, 'आताच्या परिस्थितीत आम्हालाही राजकारण करायचं नाही. नाहीतर मी अनेक गोष्टी सांगू शकतो. काय घडलंय, काय घडतंय.. मला सगळं दिसतंय.' हे विधान अजित पवारांच्या निधनानंतर अजित पवार गटात सुरू असलेल्या नेतृत्व आणि विलिनीकरणाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर आले आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांनी टाकला नवा डाव, पाहा NCP विलिनीकरणावर काय म्हणाले
मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, "राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष आहे. त्यात कोणाला पद द्यायचं, तिकीट द्यायचं याचे निर्णय ते घेतात ते निर्णय आम्ही घेत नाही. यापूर्वीही तुम्ही पाहिलं असेल की, जेव्हापासून ते आमच्यासोबत आले कोणाला खासदार करायचं, कोणाला आमदार करायचं, कोणाला अध्यक्ष करायचं, कोणाला सचिव करायचं.. त्यांचे सगळे निर्णय त्यांनी घेतले आहेत. त्या निर्णयांबाबत आमचं काही म्हणणंही नाही." एनसीपीच्या अंतर्गत बाबींमध्ये महायुती किंवा भाजपचा हस्तक्षेप नसल्याचे त्यांनी यातून स्पष्ट केले.
हे ही वाचा>> मोठी बातमी: NCP च्या राष्ट्रीय अध्यक्षाचं नाव ठरलं, प्रफुल पटेल नाही तर 'यांच्या' नावाची अखेर झाली घोषणा
विलिनीकरणाच्या चर्चांबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, "एक लक्षात ठेवा की, समजा.. अजित पवार साहेब हे अशा प्रकारचं कुठलंही एकत्रिकरणाची चर्चा जर करत होते तर ते कुठलीही चर्चा भाजपशी चर्चा केल्याशिवाय करतील का? त्यामुळे ते जर चर्चा करत असतील तर त्यांनी भाजपशी चर्चा केली असेल. ते करत नसतील तर वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की, पहिल्यांदा हे लक्षात घेतलं पाहिजे की, पुन्हा एकदा सांगतो.. चर्चा करायची नाही करायची.. विलिनीकरण करायचं हे सर्वस्वी 100 टक्के राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं डोमेन आहे." त्यांनी एनसीपीच्या निर्णयांचा पूर्ण आदर असल्याचे सांगितले आणि अपेक्षा व्यक्त केली की, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी एनसीपी आमच्याशी चर्चा करेल, जसे ते पूर्वी करत होते.
हे ही वाचा>> 'प्रफुल पटेलांची NCP चे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालीए', भाजपच्या मोठ्या मंत्र्याने केली थेट घोषणा.. महाराष्ट्रात उडाली गडबड!
फडणवीस यांनी अफवा आणि कन्फ्यूजन निर्माण करण्यावर टीका करत सांगितले, "आमची अपेक्षा एवढी असेल की, कुठलाही निर्णय घेण्याआधी त्यांनी आमच्याशी एकदा चर्चा करावी. ते करतातच.. आणि ते पुढेही करतील. त्यामुळे याही संदर्भात.. दुसरं समजा, अजित पवार साहेब अशा प्रकारच्या चर्चा करत होते. तर ती चर्चा NDA मधून बाहेर पडण्याकरिता करत होते का? ते काही सरकारमधून बाहेर पडणार होते का? सरकारमध्ये ते स्पष्टपणे स्थिर होते. त्यामुळे रोज काही तरी कन्फ्यूजन तयार करायचं आणि मग आपली इको सिस्टिम वापरून ते कन्फ्यूजन इको करायचं ही पद्धत अयोग्य आहे." त्यांनी अजित पवारांशी असलेल्या वैयक्तिक संबंधांचा उल्लेख करत सांगितले की, अजित पवारांच्या निधनाच्या आदल्या दिवशी त्यांच्याशी एक तास चर्चा झाली होती आणि ते सर्व गोष्टी शेअर करत असत.










