मुलीचं लग्न चार दिवसांवर असताना बिल्डरने स्वत:वर गोळ्या झाडल्या

मुंबई तक

builder tushar ghelani attempts suicide : कुटुंबीयांनी तात्काळ त्यांना महावीर रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं असून, सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. प्रकृतीची नाजूक स्थिती पाहता, त्यांना एअर अॅम्ब्युलन्सद्वारे मुंबईला हलवण्याची तयारीही सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुलीचं लग्न चार दिवसांवर असताना बिल्डरचं टोकाचं पाऊल

point

स्वत:वर गोळ्या झाडल्या

builder tushar ghelani attempts suicide : गुजरातमधील डायमंड सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरतमधून एक धक्कादायक घटना समोर आली असून, या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरून गेलं आहे. सुरत येथील प्रसिद्ध रिअल इस्टेट व्यावसायिक आणि ‘जॉली ग्रुप’चे सर्वेसर्वा तुषार घेलाणी यांनी रविवारी रात्री आपल्या राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा टोकाचा प्रयत्न केला. ही घटना घडली तेव्हा संपूर्ण कुटुंब मुलीच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सिटीलाइट परिसरातील तुषार घेलाणी यांच्या निवासस्थानी रात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. तुषार घेलाणी यांनी त्यांच्या परवानाधारक रिव्हॉल्वरमधून एक राउंड फायर केला. गोळीबाराचा मोठा आवाज ऐकून घरातील सदस्य घाबरून खोलीकडे धावले. तेथे दिसलेलं दृश्य अत्यंत भयावह होतं. तुषार घेलाणी रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळले होते.

कुटुंबीयांनी तात्काळ त्यांना महावीर रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं असून, सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. प्रकृतीची नाजूक स्थिती पाहता, त्यांना एअर अॅम्ब्युलन्सद्वारे मुंबईला हलवण्याची तयारीही सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा : पार्थ पवार भेटायला आल्यानंतर काय म्हणाले? विलीनीकरणाबाबत चर्चा झाली का? शरद पवारांनी सगळं सांगितलं!

हे वाचलं का?

    follow whatsapp