'साहेब, बायकोच्या प्रेमप्रकरणांना कंटाळलोय...' नवऱ्याची पोलिसांकडे धाव, बायकोविषयी काय केली तक्रार?
Crime news : प्रेमप्रकरणातून पळून जाणाऱ्या प्रेमीयुगुलांविषयी आपण बऱ्याचदा ऐकतो. मात्र हे प्रकरण काहीसं वेगळं आहे. बायकोच्या वारंवार पळून जाण्याने वैतागलेला एक नवरा थेट पोलिसांकडे पोहोचला. त्याने सांगितले की, त्याची 45 वर्षीय पत्नी शेजारच्या तरुणासोबत पळून गेली आहे. याआधीही ती बऱ्याचदा पळून गेली आहे. यापुढं तो म्हणाला की, 'हे खूप झाले साहेब. आता गुन्हा दाखल करा.'
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
साहेब, बायकोच्या प्रेमप्रकरणांना कंटाळलोय...
नवऱ्याची पोलिसांकडे धाव
Crime news : प्रेमप्रकरणातून पळून जाणाऱ्या प्रेमीयुगुलांविषयी आपण बऱ्याचदा ऐकतो. मात्र हे प्रकरण काहीसं वेगळं आहे. बायकोच्या वारंवार पळून जाण्याने वैतागलेला एक नवरा थेट पोलिसांकडे पोहोचला. त्याने सांगितले की, त्याची 45 वर्षीय पत्नी शेजारच्या तरुणासोबत पळून गेली आहे. याआधीही ती बऱ्याचदा पळून गेली आहे. यापुढं तो म्हणाला की, 'हे खूप झाले साहेब. आता गुन्हा दाखल करा.' दरम्यान, पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे. उत्तरप्रदेशातील कौशांबी येथील ही घटना आहे.
हे ही वाचा : तृतीयपंथीयासोबत लग्न केलं, काही दिवस सोबत राहिला... आणि दागिने-रोकड घेऊन तरुण पसार!
नवऱ्याची नेमकी तक्रार काय आहे?
उत्तर प्रदेशातील कौशांबी येथील हे प्रकरण आहे. एका व्यक्तीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे की, त्याची 45 वर्षीय पत्नी एका तरुण शेजाऱ्यासोबत पळून गेली आहे. त्या तरुणासोबत असलेल्या प्रेमसंबंधामुळे ती त्याला सोडून गेली आहे. पीडित नवऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, घरातून पळून जाण्याची त्याच्या बायकोची ही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वीही ती अनेक वेळा निघून गेली आहे. आता त्याने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
बायकोचे शेजारी राहणाऱ्याशी प्रेमसंबंध
नवऱ्याने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्याच्या बायकोचे शेजारी राहणाऱ्या नीरज नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. 28 जानेवारी रोजी नीरजने तिला फूस लावून पळवून नेले. कुटुंबियांनी खूप शोधले पण ती सापडली नाही. त्यानंतर त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली.










