भाच्याच्या प्रेमात मामी आकंठ बुडाली! पतीची निर्दयी हत्या अन् मृतदेहासमोर प्रियकरासोबत शारीरिक संबंध...
एका महिलेने तिच्या भाच्यासोबत मिळून आपल्या पतीची निर्घृण हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. वृत्तानुसार, आरोपी महिलेचे तिच्या भाच्यासोबत अनैतिक प्रेमसंबंध सुरू होते आणि म्हणूनच पतीला प्रेमसंबंधाच्या मार्गातून दूर करण्यासाठी तिने पतीची हत्या केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भाच्याच्या प्रेमात मामी आकंठ बुडाली!
पतीची निर्दयी हत्या अन् मृतदेहासमोर प्रियकरासोबत शारीरिक संबंध...
Crime News: एका महिलेने तिच्या भाच्यासोबत मिळून आपल्या पतीची निर्घृण हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. वृत्तानुसार, आरोपी महिलेचे तिच्या भाच्यासोबत अनैतिक प्रेमसंबंध सुरू होते आणि म्हणूनच पतीला प्रेमसंबंधाच्या मार्गातून दूर करण्यासाठी तिने पतीची हत्या केली. इतकेच नव्हे तर, हा गुन्हा लपवण्यासाठी तिने वेगळाच कट रचला. मात्र, महिलेच्या 7 वर्षांच्या मुलाने आईचा कट उघडकीस आणला. संबंधित घटना ही उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूर येथे घडली.
पतीच्या हत्येनंतर, प्रियकरासोबत लैंगिक संबंध
28 जानेवारीच्या रात्री हा भयानक कट रचण्यात आला. आरोपी प्रियकराचं नाव आदेश असून तो त्याचा मित्र रामचंद्रसोबत हरदोईहून शाहजहांपूरमधील भटपुरा चटू गावात पोहोचला. त्यानंतर, त्याने रामचंद्रला बाहेर सोडलं आपल्या घरात देला. पोलीस सूत्रांच्या म्हणण्यानुसार, त्या रात्री आरोपी पूजाने आधी तिचा पती बलरामसोबत लैंगिक संबंध ठेवले आणि नंतर त्याचा गळा चिरून हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे, पतीची हत्या केल्यानंतर पूजाने तिच्या प्रियकरासोबतही लैंगिक संबंध प्रस्थापित केले.
मुलाच्या जबाबाने सगळं उघडकीस
29 जानेवारी रोजी सकाळी, बलरामचा धाकटा भाऊ त्याला कामावर जाण्यासाठी हाक मारत होता, तेव्हा त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर, त्याने आत जाऊन पाहिलं तर बलराम रक्ताच्या थारोळ्यात पडला होता आणि त्याची पत्नी पूजा त्याच्या मृतदेहाजवळच जवळच होती. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर, पूजाने रडण्याचं नाटक केलं आणि तिच्या प्रियकर तसेच त्याच्या मित्रांवर हत्येचा आरोप केला. पूजाच्या 7 वर्षांच्या मुलाची चौकशी सुरू असताना तो म्हणाला की, "जेव्हा बाबा ओरडत होते, तेव्हा आई म्हणाली की त्यांना इंजेक्शन दिलं जात आहे." मुलाचं हे बोलणं ऐकून पोलिसांना संशय आला. या एकाच पुराव्याने पोलिसांच्या तपासाला वळण मिळालं आणि कठोर चौकशीनंतर पूजाने तिचा गुन्हा कबूल केला.
हे ही वाचा: 'पार्थ पवारांनी सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला येऊ नये', भाजपकडून स्पष्ट संदेश.. बारामतीलाच का थांबले पार्थ पवार?
भाच्याच्या प्रेमात वेडी अन् पतीला संपवलं
चौकशीत असं दिसून आलं की पूजा अशिक्षित होती, परंतु तिने तिच्या भाच्याला स्वत:कडे आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला. ती तिच्या पतीला त्याच्या स्टेटसवर दुःखद गाणी आणि इंस्टाग्राम रील्स अपलोड करायला लावायची जेणेकरून तिचा प्रियकर ते पाहू शकेल. पतीच्या हत्येनंतर, कोणताही पुरावा मागे राहू नये, यासाठी तिने तिचा मोबाईल फोन सुद्धा तोडला. 10 वर्षांपूर्वी पूजा आणि बलरामचं एकमेकांसोबत लग्न झालं होतं. पण वर्षभरापासून ती तिच्या भाच्याच्या प्रेमात इतकी वेडी झाली की तिने तिच्या पतीला संपवलं. 30 जानेवारीच्या संध्याकाळी पोलिसांनी आरोपी पत्नी पूजा, तिचा प्रियकर आदेश आणि साथीदार रामचंद्र यांना अटक केली असून त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.










