19 वर्षाच्या मेहुणीवर बंद दाराआड दाजी करत होता लैंगिक अत्याचार, आई येताच...
crime news : आजारपणाच्या उपचारासाठी माहेरी आलेल्या मेहुणीवर दाजीने वाईट नजर ठेवली होती. मेहुणीला दाजीने एकटं पाहून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. आरोपी तिच्यासोबत वाईट कृत्य करताना मुलीची आई तिथे आली नंतर आरोपीने तिला धमकावले आणि घटनास्थळावरून पळ काढला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महिलेची तब्येत बरी नव्हती म्हणून आली होती माहेरी
मेहुणीला एकटं पाहून दाजीने दरवाजा लावत आतमध्ये...
Crime news : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये आजारपणाच्या उपचारासाठी माहेरी आलेल्या मेहुणीवर दाजीने वाईट नजर ठेवली होती. मेहुणीला दाजीने एकटं पाहून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. आरोपी तिच्यासोबत वाईट कृत्य करताना मुलीची आई तिथे आली नंतर आरोपीने तिला धमकावले आणि घटनास्थळावरून पळ काढला. पीडितेनं या प्रकरणी दाजीवर अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.
हे ही वाचा : जालना : 18 वर्षीय पवनने मुलीला चिठ्ठी दिली, पण जीवानीशी गेला; अंबड तालुक्यात काय घडलं?
महिलेची तब्येत बरी नव्हती म्हणून आली होती माहेरी
पीडित तरुणी ही केवळ 19 वर्षांची होती. तिची तब्येत बरी नसल्याने ती आपल्या माहेरी आली होती. दरम्यान ही घटना ग्वाल्हेरच्या थाटीपूर पोलीस ठाणे परिसरात 60 फुटा रोड येथे घडल्याचं वृत्त आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
मेहुणीला एकटं पाहून दाजीने दरवाजा लावत आतमध्ये...
महिला तिचा चुलत दाजी धर्मवीरशी संवाद साधत होती. महिला घरी एकटी असताना तिची आई आणि भाऊ कामानिमित्त बाहेर गेले होते. तेव्हा तिला धर्मवीरचा फोन आला होता. ती महिला घरात एकटीच होती, या घटनेची माहिती समजताच, त्याने फोन कट करत काही वेळातच तिच्या माहेरच्या घराकडे धाव घेतली होती.
पीडितेवर जबरदस्ती सुरु असताना आईनं पाहिलं...
आत गेल्यानंतर मेहुण्याने दरवाजा बंद केला आणि तिच्यावर जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. याचदरम्यान पीडितेची आई घरात आली आणि तिने हा धक्कादायक प्रकार पाहताच आरोपीनेच तिला धमकावले आणि तो घटनास्थळावरून पळून गेला. पीडितेनं आपल्या पतीला घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि तो तिच्यासोबत पोलीस ठाण्यात गेला.










