दगडाने डोकं ठेचून महिलेला संपवलं, नग्न अवस्थेत मृतदेह रस्त्यावर आढळला, नेमकं काय घडलं?
crime news : गावाबाहेरील मुख्य रस्त्यावर एका महिलेचा मृतदेह पडलेला आढळून आला होता. तिच्या अंगावर कपडे नव्हते. संबंधित मृतदेह बघितल्यानंतर समजते की, महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली आणि तो मृतदेह एका रस्त्यावर फेकून देण्यात आला होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
हल्लेखोराने महिलेचा मृतदेह दगडाने ठेचला
महिलेची ओळख लपवण्यासाठी हल्लोखोरांनी काय केलं?
Crime News : उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील बैरघट्टा गावात काही लोक सकाळी फिरायला घराबाहेर पडले होते. गावाबाहेरीस मुख्य रस्त्यावर एका महिलेचा मृतदेह पडलेला आढळून आला होता. तिच्या अंगावर कपडे नव्हते. संबंधित मृतदेह बघितल्यानंतर समजते की, महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली. नंतर तिचा मृतदेह टाकून देण्यात आला होता.
हे ही वाचा : मंदिरात जाते असं सांगून पत्नी गेली बॉयफ्रेंडसोबत पळून, नवऱ्याला समजताच जीवन संपवलं, सुसाईड नोटमध्ये...
हल्लेखोराने महिलेचा मृतदेह दगडाने ठेचला
तिच्या डोक्यावर आणि शरीराच्या इतर काही भागांवर जखमा आढळून आल्या होत्या. मारेकरी धूर्त होता. कोणीही तिची ओळख पटवू नये असं त्याचं म्हणणं होतं. हल्लेखोराने महिलेचं डोकं ठेचून टाकलं. दरम्यान, मृतेहाची ओळख पटवणं कठीण जात होतं. पोलिसांनी श्वास पथक आणि फॉरेन्सिक पथकाला सोबत घेत घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरील अधिकारी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी जवळच्या रहिवाशांची चौकशी करत आहेत. सीसीटीव्ही आणि पाळत ठेवून पुढील तपास सुरु आहे.
महिलेची ओळख लपवण्यासाठी हल्लोखोरांनी काय केलं?
पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, संबंधित हत्या ही दुसऱ्याच ठिकाणी झाली होती. मृतदेह मुख्य रस्त्यावर आणून टाकण्यात आला होता. महिलेची ओळख लपवण्यासाठी, तिच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर जड वस्तूने हल्ला करण्यात आला होता. पोलिसांच्या मते, डोक्याला गंभीर दुखापत असल्याचा संशय आहे.
हे ही वाचा : मिरा भाईंदरमध्ये पुन्हा एकदा गुजराती महापौर? मराठी एकीकरण समितीनं केला होता विरोध
कपाळाच्या डाव्या बाजूला गोळी लागल्याचं निशाण
कपाळाच्या डाव्या बाजूला गोळी लागल्याचं निशाण दिसून आलं. गळ्यात टॉवेलसारखं कापड गुंडाळण्यात आलं होतं. मृतदेहाला दुसऱ्या ठिकाणी नेऊन दिशाभूल करण्याचा जाणीवपूर्वक केलेला हा प्रयत्न असल्याचे पोलिसांचं म्हणणं आहे. या प्रकरणी दोन पथके तयार करण्यात आली असून एक पथक हे मृतेदाहाची ओळख पटवण्याचे काम करत आहे, तर दुसरीकडे सीसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपीची ओळख पटवण्याचे काम करते.










