मिरा भाईंदरमध्ये पुन्हा एकदा गुजराती महापौर? मराठी एकीकरण समितीनं केला होता विरोध
Mira Bhayandar Mayor : महापालिका निवडणुकीनंतर मिरा भाईंदर महापालिकेत गेल्या काही दिवसांपासून मराठी एकीकरण समितीने महापौर हा मराठी व्हावा अशी मागणी केली होती. जर मराठी महापौर न दिल्यास उग्र आंदोलन करू असं ठणकावून सरकारला इशारा दिला होता. त्यानंतर नरेंद्र मेहता च्या वहिनी यांना दुसऱ्यांदा महापौर बनवण्यात येणार आहे तर उपमहापौर म्हणून ध्रुवकिशोर पाटील यांचं नाव फायनल झालं आहे. यामुळे मिरा भाईंदर महापालिकेत पुन्हा एकदा गुजराती महापौर होणार असल्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भाजपाने 78 जागा जिंकत मिरा-भाईंदरमध्ये एकहाती सत्ता स्थापन केली
महापौर आणि उपमहापौर पदासाठी नावे जाहीर
Mira Bhayandar Mayor : प्रवीण नलवडे - महापालिका निवडणुकीनंतर मिरा भाईंदर महापालिकेत गेल्या काही दिवसांपासून मराठी एकीकरण समितीने महापौर हा मराठी व्हावा अशी मागणी केली होती. जर मराठी महापौर न दिल्यास उग्र आंदोलन करू असं ठणकावून सरकारला इशारा दिला होता. त्यानंतर नरेंद्र मेहता च्या वहिनी यांना दुसऱ्यांदा महापौर बनवण्यात येणार आहे तर उपमहापौर म्हणून ध्रुवकिशोर पाटील यांचं नाव फायनल झालं आहे. यामुळे मिरा भाईंदर महापालिकेत पुन्हा एकदा गुजराती महापौर होणार असल्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार? फडणवीसांसोबत राष्ट्रवादीची बैठक, प्रफुल पटेलांनी सांगितलं...
भाजपाने 78 जागा जिंकत मिरा-भाईंदरमध्ये एकहाती सत्ता स्थापन केली
मिरा-भाईंदर महानगरपालिकेत एकूण 95 जागांपैकी भाजपाने 78 जागा जिंकत एकहाती सत्ता स्थापन केली आहे. तर काँग्रेसने 13 आणि शिवसेना (शिंदे गटाने) 3 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेस व शिवसेना (शिंदे गट) यांनी एकत्र येत मिरा-भाईंदर विकास आघाडीची स्थापना केली.
या विकास आघाडीतर्फे प्रभाग क्र. 19 मधील नगरसेविका रुबीना शेख यांनी महापौरपदासाठी तर प्रभाग क्र. 11 मधील नगरसेविका वंदना पाटील यांना उपमहापौर पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.










