'अजित दादांना कालच अग्नी दिलाय, त्यांच्या नावानं राजकारण करणं अमानुष..' संजय राऊतांनी व्यक्त केला संताप
Sanajay Raut : अजित दादांना कालच अग्नी देण्यात आला आहे. अजित दादांच्या जाण्याच्या धक्क्यातून महाराष्ट्र अद्याप सावरलेला नाही. जर कोणी त्यांच्या नावानं राजकारण करत असेल तर ते सर्वस्वी चुकीचं असल्याचं मत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, 'तळागाळातील कार्यकर्ते, सामान्य लोक यांना मोठा धक्का बसलेला आहे. अशावेळी पुढील किमान पंधरा-वीस दिवस चर्चा करणं अमानुष आहे.'
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अजित दादांना कालच अग्नी दिलाय, त्यांच्या नावानं राजकारण करणं अमानुष
संजय राऊतांनी व्यक्त केला संताप
Sanajay Raut : अजित दादांना कालच अग्नी देण्यात आला आहे. अजित दादांच्या जाण्याच्या धक्क्यातून महाराष्ट्र अद्याप सावरलेला नाही. जर कोणी त्यांच्या नावानं राजकारण करत असेल तर ते सर्वस्वी चुकीचं असल्याचं मत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, 'तळागाळातील कार्यकर्ते, सामान्य लोक यांना मोठा धक्का बसलेला आहे. अशावेळी पुढील किमान पंधरा-वीस दिवस चर्चा करणं अमानुष आहे. हा विषय पक्षाअंतर्गत आहे. सुनेत्रा ताईंनी आपला पती गमावला आहे. त्यांच्या कुटुंबानं कर्ता पुरुष गमावला आहे. त्यांच्या डोळ्यात अजून अश्रूंच्या धारा वाहताहेत. अशा वेळेस कुणी नेतृत्व करावं यावर पत्ते आणि डाव खेळणं अमानुष आहे.'
हे ही वाचा : MOTN: देशात भाजपची त्सुनामी, आज निवडणुका झाल्या तर एकट्या भाजपला मिळतील 'एवढ्या' जागा: Survey
अपघाताची जबाबदारी डीजीसीएने घ्यावी
अजित दादांच्या अपघातानंतर संजय राऊत यांनी दोन मागण्या केल्या आहेत. ते म्हणाले की, 'माझ्या दोन मागण्या आहेत, त्या अराजकीय आहेत. सगळ्या विमानांवर डीजीसीएचं नियंत्रण असतं. गेल्या काही काळात अनेक विमान अपघात झाले आहेत. त्यात अनेक प्रमुख लोकांचं निधन झालेलं आहे. अशा वेळी फक्त एखादा अपघात झाल्यावर चौकशीची घोषणा केली जाते. त्या चौकशीचं पुढं काय होतं? बारामती विमानतळावर रडार नव्हतं, एटीसी नव्हतं, कोणतीही यंत्रणा नव्हती. हे जर खरं असेल तर त्याला डीजीसीए जबाबदार आहे. आम्ही या अपघातात अजित पवारांसारखा एक महत्त्वाचा माणूस गमावला आहे. याची जबाबदारी डीजीसीएने घ्यायला हवी.'
अजित दादांवरील घोटाळ्याचे आरोप मागे घ्यावेत
दुसरी मागणी काय आहे हे सांगताना राऊत म्हणाले की, 'माझी दुसरी मागणी अशी आहे की, अजित दादांवर भाजपचं खरोखर प्रेम असेल तर त्यांच्यावरील सिंचन घोटाळ्याचे आरोप मागे घ्यावे. नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांनी अजित दादांवर सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. तो मागे घ्यावा. तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांच्यावरही आरोप झाले. मात्र ते निर्दोष ठरले. आमच्यावरही आरोप केले आम्हाला देखील कोर्ट सोडेल.'










