'भाजपकडून अजितदादांना श्रद्धांजलीच्या पानभर जाहिराती, संजय राऊत यांचा भाजपवर संताप
Sanjay Raut : अजित पवार यांच्या विमान अपघात निधनाने राज्यात शोक व्यक्त केला जात आहे. आज 29 जानेवारी रोजी बारामतीत अजितदादांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर राज्यातून अजितदादांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. या दुर्दैवी घटनेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पान भर जाहिराती दिल्या! त्याने काय होणार, अशा आशयाचे ट्विट करत भाजपवर सडकून टीका केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
संजय राऊत यांचं एक्स ट्विट
'70 हजार कोटींचे आरोप मागे घेणं हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली'
Sanjay Raut Tweet : अजित पवार यांच्या निधनानंतर भाजपने अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिल्याच्या अनेक जाहिराती सर्वच वर्तमानपत्रांना देण्यात आल्या. याचवरून आता संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. श्रद्धांजली वाहून काय होणार? सिंचन घोटाळ्याचे आरोप तुम्ही मागे घ्यावेत, हिच खरी श्रद्धांजली असेल, असं संजय राऊत यांनी ट्विट केलं. संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहेत.
हे ही वाचा : भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसची का गरज आहे? अजितदादांनी महायुतीशी कसं संतुलन राखलं होतं?
संजय राऊत यांचं 'X' ट्विट
संजय राऊत यांनी आपल्या एक्स ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये संजय राऊत यांनी भाजपला घेरलं. अजित पवार यांच्या निधनानंतर भाजपने 29 जानेवारी रोजी अनेक वर्तमानपत्रांनी जाहिराती देऊन अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या जाहिरातीवरून संजय राऊत यांनी भाजपला सुनावलं आहे.
'70 हजार कोटींचे आरोप मागे घेणं हीच अजित पवार यांना खरी श्रद्धांजली'
'भाजपने कमालच केली, दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पान भर जाहिराती दिल्या! त्याने काय होणर? असा प्रश्न उपस्थित केला होता'. नंतर ते पुढे म्हणाले की, 'दादांवर भाजपा म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेले 70 हजार कोटींचे आरोप मागे घेणं हीच अजित पवार यांना खरी श्रद्धांजली ठरेल,' असं ट्विट अजित पवार यांनी केलं होतं.
हे ही वाचा : Ajit Pawar: सरकार कोणाचंही असो अजित पवार उपमुख्यमंत्री बनायचे, दादांची 45 वर्षांची राजकीय कारकीर्द कशी होती?
तसेच त्यांनी अजितदादांवर करण्यात आलेल्या 70 हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचे आरोप मागे घ्यावेत, अशी मागणी केली. संजय राऊत यांनी केलेल्या ट्वीटनंतर भाजप नेत्यांकड़ून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.










