भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसची का गरज आहे? अजितदादांनी महायुतीशी कसं संतुलन राखलं होतं?
Ajit Pawar Death : अजितदादांच्या निधनाने केवळ पवार कुटुंबच नाहीतर अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. अजितदादांच्या जाण्याने भाजपलाही मोठा धक्का बसला आहे. अजितदादांचे महायुती सरकारमध्ये असणं हे सरकारसाठी कशा पद्धतीने जमेची बाजू होती ते समजून घेऊयात.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची केमिस्ट्री
भाजपला अजितदादांची गरज का होती?
Ajit Pawar Death : राज्याच्या राजकारणात एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व मानले जाणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी रोजी विमान अपघातात निधन झालं. आज गुरुवार 29 जानेवारी रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अजितदादांच्या निधनाने केवळ पवार कुटुंबच नाहीतर अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. अजितदादांच्या जाण्याने भाजपलाही मोठा धक्का बसला आहे. अजितदादांचे महायुती सरकारमध्ये असणं हे सरकारसाठी कशा पद्धतीने जमेची बाजू होती ते समजून घेऊयात.
हे ही वाचा : Ajit Pawar: अवघा महाराष्ट्र पोरका... उपमुख्यमंत्री अजित पवार अनंतात विलीन
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची केमिस्ट्री
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची एक चांगली केमिस्ट्री होती. अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांची राजकीय ढाल बनून राज्य चालवत होते. अजित पवार यांच्या जाण्याने अचानकप विधानाने राज्याचे राजकीय चित्र हे काही प्रमाणात बदलण्याची शक्यता आहे. तसेच महायुती सरकारमधील काही समीकरणे बदलण्याची अधिक शक्यता आहे.
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या राजकीय युतीमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला महायुतीतत नियंत्रणात आणलं जायचं. आता अजित पवार यांच्या निधनाने महायुतीची सत्तेची समीकरणे बिघडू लागल्याचं बोललं जातंय. महायुतीत अजित पवार यांचं असणं भाजपसाठी किती महत्त्वाचं होतं, त्यांची राजकीय केमिस्ट्री पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आली आहे.
राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपहून वैचारिक पातळीवर वेगळा पक्ष आहे. पण असे असले तरीही अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे एकमेकांशी सलोख्याचे संबंध होते. 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपशी युती तोडली आणि नंतर महाविकास आघाडीशी हात मिळवणी केली होती, तेव्हा अजित पवारांना सोबत घेत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचं सरकार पाडून महायुतीची सत्ता स्थापन केली.










