दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची कायदेशीर प्रक्रिया सुरु झाली होती : राजेश टोपे
Rajesh Tope : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघाती मृत्यू होण्यापूर्वीच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची कायदेशीर प्रक्रिया सुरु झाली होती, अशी माहिती माजी मंत्री आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी दिलीये.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी प्रक्रिया सुरु झाली होती : राजेश टोपे
आम्ही बऱ्याच ठिकाणी घड्याळ चिन्हावर लढलो, राजेश टोपे यांचं वक्तव्य
Rajesh Tope : उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बारामती येथील विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्रावर शोककळा पसरलीये. अजित पवारांच्या जाण्याने राज्याने उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री गमावलाय. फायरब्रँड नेत्याच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झालीये. मात्र, अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी पक्षाचं नेतृत्व कोण करणार? उपमुख्यमंत्री कोण होणार? असे मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, असं असताना माजी मंत्री आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी मोठं वक्तव्य केलंय. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी कायदेशी प्रक्रिया सुरु झाली होती, असं राजेश टोपे म्हणाले आहेत.
हेही वाचा : अरे बेट्यांनो इतक्या लवकर तुम्हाला सोडून जात नसतो, मला अजित पवार म्हणतात, काळजाचा ठोका चुकवणारा AI VIDEO
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी प्रक्रिया सुरु झाली होती : राजेश टोपे
राजेश टोपे म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. आम्ही घड्याळ चिन्हावर जास्त प्रमाणात लढलो होतो. तुतारीचे नेतेही महापालिका निवडणुकांमध्ये घड्याळ चिन्हावर लढले होते. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात, ही पक्षाच्या अनेक नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांची देखील इच्छा होती.
अजित पवारांबाबत बोलताना राजेश टोपे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आणि आमचे दोन पिढ्यांचे संबंध आहेत. माझ्या वडिलांपासून आमचे कौटुंबिक संबंध होते. ते आम्हाला हक्काने रागवायचे. मला कारखाना बघ म्हणून सूचनाही दिल्या होत्या.










