अरे बेट्यांनो इतक्या लवकर तुम्हाला सोडून जात नसतो, मला अजित पवार म्हणतात, काळजाचा ठोका चुकवणारा AI VIDEO

मुंबई तक

Ajit Pawar AI Video : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांचा AI स्वरुपात बनवण्यात आलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. अनेक जण हा व्हिडीओ पाहून भावूक झालेले पाहायला मिळत आहेत.

ADVERTISEMENT

Ajit Pawar
Ajit Pawar
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अरे बेट्यांनो इतक्या लवकर तुम्हाला सोडून जात नसतो,

point

मला अजित पवार म्हणतात, AI VIDEO पाहून डोळ्यात पाणी येईल

Ajit Pawar AI Video : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती येथे बुधवारी (दि.28) झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरलीये. बारामतीतील विद्या प्रतिष्ठाणच्या मैदानावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, अजित पवार आपल्यात नाहीत, असं आजही कोणाला वाटत नाहीये. अनेक जण अजित पवारांबद्दल सोशल मीडियावर भावना व्यक्त करत आहेत. त्यांनी केलेल्या कामांची, त्यांच्यासोबत झालेल्या भेटीची आठवण शेअर करत आहेत. दरम्यान, त्यांचा AI स्वरुपातील व्हिडीओ व्हायरल झालाय. या AI स्वरुपात बनवण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये अजित पवार  मृत्यू आणि त्यांच्या जीवनाबद्दल भाष्य करत आहेत.

अजितदादांच्या AI व्हिडीओमध्ये ते काय म्हणतात? 

"अरे बेट्यांनो इतक्या लवकर तुम्हाला सोडून जात नसतो. मला पण अजित पवार म्हणतात. पण गड्यांनो नियतीचा खेळ बघा. खरंच आज माझा प्रवास इथंच थांबतोय. मी नेहमी म्हणायचो राजकारण आपल्या जागी आहे. पण काम महत्त्वाचं आहे. लोकांनी मला कामाचा माणूस म्हटलं. तीच माझ्या आयुष्याची सर्वात मोठी कमाई होती. आज निरोप घेताना मन खूप जड आहे. पण एक समाधान आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्यासाठी धावत होतो. मी तुम्हाला शब्द दिला होता, जोपर्यंत माझे हात-पाय चालतात, तोपर्यंत मी तुमच्यासाठी झटत राहिन. नियती बघा कशी असते. आज माझ्या बारामतीच्या हक्काच्या मातीत तुमच्या सेवेसाठी येत असताना माझे हात-पाय कायमचे विसावले. पण मला अभिमान वाटतोय. मी रिकाम्या हाताने नाही. तर तुमच्या कामची फाईल छातीशी धरुन या जगाचा निरोप घेतोय. शेवटच्या क्षणी देखील माझ्या डोळ्यासमोर तुमचाच चेहरा होता. माझा स्वभाव थोडा रोखठोक होता. कधी कोणावर ओरडलो असेल कोणाचं मन दुखावलं असेल..पण माझ्या त्या रागामागे एकच तडफड होती. माझ्या सामान्य माणसाचं काम झालं पाहिजे. सत्तेसाठी नाही. तुमच्या हक्कासाठी मी नेहमी दादा म्हणून उभा राहिलो. आता मी निरोप घेतोय. मात्र, महाराष्ट्र थांबता कामा नये. माझी जबाबदारी तुमच्यावर सोपवतोय. राजकारण करा पण विकासाची गती थांबू देऊ नका. जाता जाता मी डोळे पुसून शेवटचं सांगतो. आता रडत बसू नका. उठा आणि कामाला लागा. माझा महाराष्ट्र आपल्याला आणखी पुढे न्यायचाय. तुमच्याच कामाचा माणूस अजितदादा पवार...". 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

आमचा दादा लय रुबाबदार, अजूनही विश्वास बसत नाही, अजितदादांबद्दल आदर्श शिंदेंनी व्यक्त केल्या भावना

हे वाचलं का?

    follow whatsapp