'सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली अजित पवारांच्या मृत्यूची चौकशी करावी', ममता बॅनर्जी यांची मागणी

मुंबई तक

Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा 28 जानेवारी रोजी बुधवारी सकाळी अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांचं निधन झालं. अजित पवार यांच्या अकाली एक्झिटने राज्यातील राजकीय वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे. अशातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी करण्याची मागणी केली आहे. 

ADVERTISEMENT

ajit pawar death
ajit pawar death
social share
google news

बातम्या हायलाइट

point

काय म्हणाल्या ममता बॅनर्जी ? 

point

ममता बॅनर्जीकडून अपघाताच्या तपासाची मागणी 

Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा 28 जानेवारी रोजी बुधवारी सकाळी अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांचं निधन झालं. अजित पवार यांच्या अकाली एक्झिटने राज्यातील राजकीय वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे. अशातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी करण्याची मागणी केली आहे. 

हे ही वाचा : अजित पवार यांचं चार्टर विमान उडवणारी शांभवी पाटील कोण? कारकिर्दीची पूर्ण माहिती

उपमुख्यमंत्री अजित पवार हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी मुंबईहून बारामतीकडे निघाले होते. बारामतीमधील धावपट्टीपासून काही अंतरावर विमानाचा अपघात झाला. ही घटना सकाळी 8 : 50 वाजता घडली. या अपघातात ट्विन इंजिन पूर्णपणे नष्ट झाले. भीषण अपघातात इतर लोकांचाही मृत्यू झाल्याची घटना घडली.

काय म्हणाल्या ममता बॅनर्जी? 

या दुर्दैवी घटनेनंतर ममता बॅनर्जी यांनी अजित पवार यांच्या अपघातावर अनेक प्रश्न उपस्थित केले. अजित पवार हे पुन्हा महायुती आणि भाजपपासून दूर जाण्याची सोशल मीडियावर चर्चा होती. याच अपघाताची निष्पक्षपणे चौकशी व्हावी. सुप्रीम कोर्टाने दखल घ्यावी, तसेच इतर कोणत्याही तपास यंत्रणांवर विश्वास नसल्याचं ममता बॅनर्जी म्हणाल्या. 

हे ही वाचा : LIVE Update: अजित पवार यांच्या अंत्यसंस्काराबाबत नेमकी माहिती आली समोर! कधी आणि कुठे होणार?

इतर नेत्यांकडून अपघाताच्या तपासाची मागणी 

ममता बॅनर्जींसह इतर काही नेत्यांनी या अपघाताची मागणी केली आहे. ज्यात खासदार गौरव गोगोई, लालू यादव आणि प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्र आणि पारदर्शकतेची मागणी केली आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp