अजित पवार यांचं चार्टर विमान उडवणारी शांभवी पाटील कोण? कारकिर्दीची पूर्ण माहिती

मुंबई तक

Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज 28 जानेवारी रोजी बारामतीत विमान अपघातात निधन झालं. या विमान अपघातात अजितदादांसह प्राइव्हेट चार्टर विमान Larjet 45 च्या पायलटचा देखील मृत्यू झाला आहे, त्या पायलटचं नाव शांभवी पाठक असे होते. नेमक्या कोण आहेत शांभवी पाठक याची माहिती पुढीलप्रमाणे नेमूद करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

Ajit Pawar
Ajit Pawar
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू

point

शांभवी पाठकच्या कारकीर्दीची सुरुवात 

Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज 28 जानेवारी रोजी बारामतीत विमान अपघातात निधन झालं. या विमान अपघातात अजितदादांसह काही सहकाऱ्यांचा देखील समावेश होता. त्यापैकी अजित पवार यांच्या प्राइव्हेट चार्टर विमान Larjet 45 च्या पायलटचा मृत्यू झाला आहे. शांभवी पाठक (वय 25) असे मृत पायलटचं नाव आहे. नेमकी कोण आहे शांभवी पाठक याची माहिती जाणून घेऊयात.

मृत पायलट शांभवी पाठक कोण? 

शांभवी पाठक ही देशातील एकूण तरुण महिला पायलटपैकी एक होती. ती कॉर्पोरेट आणि चार्टर विमानाच्या पायलट म्हणून कार्यरत होती. तिने ग्वालियरच्या एअरफोर्स स्कूल येथून शिक्षण पूर्ण केलं होतं. तसेच मुंबई विद्यापीठातून एअरोनॉटिक्सचं शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर न्यूझीलंड येथून कमर्शियल पायलटची ट्रेनिंग घेतली होती. 

शांभवी पाठकच्या कारकीर्दीची सुरुवात 

तिच्याकडे कमर्शियल पायलट लायसन्स आणि फ्लाइट इन्स्ट्रक्टर रेटींग आहे. तिच्या कारकीर्दीच्या सुरुवातीला, ती मध्य प्रदेश फ्लाइंग क्लबमध्ये सामील झाली आणि नंतर एव्हिएशनसाठी लिअरजेटसारख्या व्यवसायिक जेट्स हाताळले होते. ऑगस्ट 2022 पासून ती कॉर्पोरेट चार्टर ऑपरेशन्सचा भाग आहे. 

विमान वाहतूक उद्योगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शांभवी तांत्रिकदृष्ट्या सक्षम होती आणि तिला लांब पल्ल्याच्या उड्डाणांसाठी प्रशिक्षण देण्यात आले होते. पण याच अपघातात तिचाही दुर्दैवी मृत्यू झाला. 

हे वाचलं का?

    follow whatsapp