LIVE Update: विद्या प्रतिष्ठानच्या ग्राउंडवर अजित पवारांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू...

मुंबई तक

बारामतीत लँडिंगच्या वेळी झालेल्या भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली असून मृतांमध्ये 2 क्रू आणि 2 कर्माचाऱ्यांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

बातम्या हायलाइट

point

बारामतीत झालेल्या प्लेन क्रॅशमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मृत्यू

point

राज्यातील मंत्र्यांची भावूक प्रतिक्रिया

Ajit Pawar Death: अजित पवार यांची आज (दि.28) बारामतीत प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. मात्र, बारामती विमानतळावर उतरत असतानाच हे विमान अपघातग्रस्त झाल्याचे सांगितले जात आहे. नियंत्रण सुटल्याने हे विमान विमानतळाच्या परिसरातील एका शेतात कोसळले. अपघातानंतर घटनास्थळी धुराचे मोठे लोट उठताना दिसून आले, त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. पाहा, या भीषण घटनेचे लाईव्ह अपडेट्स.. 

- बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान ग्राउंडवर अजित पवार यांच्यावरील अंत्यसंस्काराची तयारी सुरू 

- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन हे देखील अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारासाठी बारामतीला जाणार आहेत.

बारामती

हे वाचलं का?