Govt Job: टपाल विभागात 28,000 हून अधिक पदांसाठी भरती! 10 पास उमेदवारांसाठी मोठी संधी, कोणतीच परीक्षा नाही अन्...
भारतीय टपाल विभाग (इंडियन पोस्ट डिपार्टमेंट) कडून 28,000 हून अधिक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासंबंधी नोटिफिकेशन जारी करण्यात आलं असून कोणत्याही परीक्षेशिवाय केवळ मेरिटच्या आधारे नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
टपाल विभागात 28,000 हून अधिक पदांसाठी भरती!
10 पास उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी
कोणत्याही परीक्षेशिवाय टपाल विभागात भरती
Govt Job: सरकारी नोकरीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या तरुणांसाठी नव्या भरतीची बातमी समोर आली आहे. भारतीय टपाल विभाग (इंडियन पोस्ट डिपार्टमेंट) कडून 28,000 हून अधिक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासंबंधी नोटिफिकेशन जारी करण्यात आलं असून कोणत्याही परीक्षेशिवाय केवळ मेरिटच्या आधारे नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे.
देशभरात एकूण 28,000 रिक्त पदे
भारतीय टपाल विभागाकडून ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) आणि असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) पदांसाठी भरतीचं नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे. या नोटिफिकेशननुसार, संबंधित भरतीच्या माध्यमातून देशभरात एकूण 28,000 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यामधील सर्वाधिक जागा या महाराष्ट्रात असून राज्यातील पोस्ट विभागात एकूण 3553 पदे भरली जाणार आहेत. दहावी उत्तीर्ण झालेल्यांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची ही एक चांगली संधी आहे. कारण या विभागात दहावीच्या गुणांच्या आधारे मेरिट लिस्टमधून उमेदवारांची नियुक्ती केली जाते.
शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाकडून गणित आणि इंग्रजी विषयांच्या गुणांसह 10 उत्तीर्ण असल्याचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. तसेच, त्यांच्याकडे संगणक कौशल्य देखील असलं पाहिजे आणि त्यांना सायकल चालवता येत असावी.
हे ही वाचा: महालक्ष्मी अन् तुळजाभवानीचं दर्शन घेऊन विठुरायाच्या दर्शनाला निघाले, पण वाटेत काळाचा घाला; चौघांचा मृत्यू
वयोमर्यादा
टपाल विभागाच्या GDS भरती 2026 साठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांचं वय किमान 18 वर्षे आणि किमान 40 वर्षे असणं आवश्यक आहे. तसेच सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट उपलब्ध आहे. सध्या, इंडिया पोस्टने रिक्त पदांच्या भरतीचं शॉर्ट नोटिफिकेशन जारी केलं असून शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांना तपशीलवार अधिसूचनेची वाट पहावी लागेल.










