दुधात उंदीर मारण्याचं औषध मिसळून पतीला प्यायलं दिलं अन् गळा दाबून हत्या... पतीच्या लैंगिक अत्याचाराला वैतागून पत्नीचं कृत्य!
एका 37 वर्षीय महिलेने तिच्यावरील वारंवार होणाऱ्या शारीरिक आणि लैंगिक अत्याचाराला वैतागून आपल्या पतीची निर्घृण हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. आरोपी महिलेने तिच्या पतीवर लैंगिक वाढीसाठी गोळ्या घेतल्याचा आणि नंतर तिच्यावर हल्ला केल्याचा आरोप केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दुधात उंदीर मारण्याचं औषध मिसळून पतीला प्यायलं दिलं अन् गळा दाबून हत्या...
पतीच्या लैंगिक अत्याचाराला वैतागून पत्नीचं कृत्य!
Crime News: एका 37 वर्षीय महिलेने तिच्यावरील वारंवार होणाऱ्या शारीरिक आणि लैंगिक अत्याचाराला वैतागून आपल्या पतीची निर्घृण हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. संबंधित प्रकरण हे गुजरातच्या सूरत शहरातील असल्याची माहिती आहे. प्रकरणाची अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, आरोपी महिलेने 5 जानेवारी रोजी हळदीच्या दुधात उंदीर मारण्याचं औषध मिसळून ते प्यायलं दिलं आणि नंतर गळा दाबून तिने आपल्या पतीची हत्या केली. रविवारी (25 जानेवारी) आरोपी महिलेला अटक करण्यात आल्याची माहिती आहे.
लैंगिक अत्याचाराचा पतीवर आरोप...
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिला आणि तिचा पती हे मूळ बिहारचे रहिवासी होते. चौकशीदरम्यान महिलेने सांगितलं की, तिचा पती तिच्यावर सतत शारीरिक आणि लैंगिक अत्याचार करायचा. त्यामुळेच तिने आपल्या पतीची ही निर्घृण हत्या केली. आरोपी महिलेने तिच्या पतीवर लैंगिक वाढीसाठी गोळ्या घेतल्याचा आणि नंतर तिच्यावर हल्ला केल्याचा आरोप केला आहे, त्यामुळेच तिला गंभीर दुखापत झाली होती. याच त्रासाला वैतागून आरोपी महिलेने आपल्या पतीची हत्या करण्याचं ठरवलं.
हे ही वाचा: मुंबई: दारूचं व्यसन आणि आई-वडिलांसोबत वाद... 21 व्या मजल्यावरून उडी मारून तरुणाने संपवलं जीवन!
हळदीच्या दुधात उंदीर मारण्याचं औषध मिसळलं
पीडित पती हा मुंबईत मजूर म्हणून काम करत होता आणि महिन्यातून एकदा आपल्या सूरतमधील घरी यायचा. पोलिसांच्या माहितीनुसार, 1 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास महिलेने उंदीर मारण्याचं औषध मिसळून पतीला हळदीचं दूध प्यायला दिलं. मात्र, त्यानंतर सुद्धा त्याचा मृत्यू न झाल्याने 5 जानेवारी रोजी त्याची गळा दाबून हत्या करण्यात आली.
हे ही वाचा: Astrology: 30 वर्षांनंतर सूर्य आणि शनिदेवाचा संयोग... 'या' राशीच्या लोकांना होणार प्रचंड धनलाभ
पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाबाबत माहिती देताना सांगितलं की, या घटनेनंतर पती आणि पत्नीमधील वादामुळे तसेच महिलेच्या वागण्यामुळे मृताच्या भावाच्या मनात संशय निर्माण झाला, त्यानंतर त्याने पोलिसांकडे धाव घेत मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली. चौकशीनंतर, मृतदेहाचं फॉरेन्सिक पोस्टमॉर्टम करण्यात आलं आणि विषबाधा झाल्याचं तसेच गळा दाबून खून करण्यात आल्याची बाब समोर आली.










