मुंबई: दारूचं व्यसन आणि आई-वडिलांसोबत वाद... 21 व्या मजल्यावरून उडी मारून तरुणाने संपवलं जीवन!
मुंबईच्या वडाळा परिसरात एका 21 वर्षीय तरुणाने इमारतीच्या 21 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. पोलिसांनी संबंधित घटनेची माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दारूचं व्यसन आणि आई-वडिलांसोबत वाद...
21 व्या मजल्यावरून उडी मारून तरुणाने संपवलं जीवन!
मुंबईतील धक्कादायक घटना
Mumbai Crime: मुंबईच्या वडाळा परिसरात एका 21 वर्षीय तरुणाने इमारतीच्या 21 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. पोलिसांनी संबंधित घटनेची माहिती दिली आहे. वडाळा टीटी पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचं नाव हैदर कराचीवाला असून त्याला दारूचं व्यसन होतं आणि याच कारणावरून त्याचे त्याच्या कुटुंबियांसोबत सतत वाद व्हायचे.
पहाटे दारूच्या नशेत सापडला
रविवारी (25 जानेवारी) सकाळच्या सुमारास मृत तरुणाचं त्याच्या आई-वडिलांसोबत भांडण झालं आणि त्यानंतर तो रागाच्या भरात घरातून निघाला. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणाचे वडील यूसुफ कराचीवाला यांना पहाटे 4 वाजताच्या सुमारास विलेपार्ले पोलीस स्टेशनमधून फोन आला आणि त्यांचा मुलगा दारूच्या नशेत सापडला असून त्याला घरी घेऊन जाण्याचं फोन सांगण्यात आलं.
हे ही वाचा: आईनेच तान्हुल्या बाळाला रस्त्याच्या कडेला फेकून दिलं, भटक्या जनावरांनी लचके तोडले; डॉक्टरांकडे नेईपर्यंत जीव गेला
आई-वडिलांसोबत वाद झाला अन्...
त्यानंतर, तरुणाचे वडील यूसुफ कराचीवाला आपल्या मुलाला घेऊन सकाळी 6 वाजताच्या सुमारास घरी आले. तेव्हा तरुणाच्या आई-वडिलांनी त्याला दारू सोडण्यासाठी समजावण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांच्या धर्मात दारूचं व्यसन वर्ज्य असल्याचं देखील त्याला त्याच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आलं. याच कारणावरून, त्यांच्यात वाद झाला आणि त्यानंतर पीडित तरुण त्याच्या खोलीत निघून गेला.
हे ही वाचा: प्रेमसंबंधात अडसर ठरतो म्हणून एका वर्षाच्या चिमुकल्याची अपहरण करून हत्या; विवाहित महिलेच्या प्रियकराचं कृत्य
खोलीच्या खिडकीतून उडी मारून आत्महत्या
पोलिसांनी या प्रकरणासंबंधी माहिती देताना सांगितलं की, सकाळी जवळपास 8:15 वाजता तरुणाने त्याच्या खोलीच्या खिडकीतून उडी मारलं असल्याचं त्याच्या वडिलांना समजलं. त्यानंतर, पोलिसांना सुद्धा या घटनेची माहिती देण्यात आली आणि पोलिसांच्याच मदतीने पीडित हैदरला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. अधिकाऱ्यांनी घटनेबद्दल माहिती देताना सांगितलं की, प्राथमिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आकस्मिक मृत्यू रिपोर्ट (एडीआर) दाखल केल्याची माहिती आहे.










