डॉक्टरांनी महिलेला 'ब्रेन डेड' घोषित केलं, व्हेंटिलेटर काढलं; अंत्यसंस्काराची तयारी अन् रुग्णवाहिकेतून नेताना जागी झाली
Brain dead woman News : रुग्णवाहिकेने विनीता यांना घरी नेले जात असताना हाफिजगंज जवळ रस्त्यावर एका मोठ्या खड्ड्यात रुग्णवाहिकेचे चाक गेले. या खड्ड्यामुळे रुग्णवाहिकेला इतका जोरात झटका बसला की, मृत समजल्या जाणाऱ्या विनीता यांच्या शरीरात अचानक हालचाल सुरू झाली. हे पाहून पती आणि नातेवाईकांना आश्चर्याचा धक्का बसला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
डॉक्टरांनी महिलेला 'ब्रेन डेड' घोषित केलं, व्हेंटिलेटर काढलं
अंत्यसंस्काराची तयारी अन् रुग्णवाहिकेतून नेताना जागी झाली
Brain dead woman News : उत्तर प्रदेशातील पीलीभीत जिल्हा न्यायालयात कार्यरत असलेल्या विनीता शुक्ला यांना प्रकृती खालावल्यामुळे बरेली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तिथे उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्यांना 'ब्रेन डेड' घोषित केले आणि व्हेंटिलेटर काढून त्यांना घरी नेण्याचा सल्ला दिला. या निधनाच्या बातमीने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. विनीता यांचे पार्थिव घरी नेण्यासाठी रुग्णवाहिका बोलावण्यात आली आणि तिकडे पीलीभीतमध्ये नातेवाईकांनी अंत्यसंस्काराची तयारीही पूर्ण केली होती. मुले आणि पती कुलदीप शुक्ला हे विनीता यांच्या शेवटच्या दर्शनासाठी अश्रू ढाळत असतानाच नियतीचा खेळ वेगळाच होता.
हेही वाचा : तीन मुली झाल्या, दुसरं लग्न करण्याची परवानगी दे, सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची विष प्राशन करून आत्महत्या
एका धक्क्याने परतले प्राण
रुग्णवाहिकेने विनीता यांना घरी नेले जात असताना हाफिजगंज जवळ रस्त्यावर एका मोठ्या खड्ड्यात रुग्णवाहिकेचे चाक गेले. या खड्ड्यामुळे रुग्णवाहिकेला इतका जोरात झटका बसला की, मृत समजल्या जाणाऱ्या विनीता यांच्या शरीरात अचानक हालचाल सुरू झाली. हे पाहून पती आणि नातेवाईकांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी विलंब न करता रुग्णवाहिका पुन्हा पीलीभीत येथील एका खासगी रुग्णालयाकडे वळवली. ज्या ठिकाणी अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती, तिथे अचानक ही 'चमत्कारा'ची बातमी पोहोचली आणि शोकसागरात बुडालेल्या कुटुंबाला आशेचा किरण दिसला.
हेही वाचा : 16 मार्चपासून महालक्ष्मी राजयोग! 'या' 3 राशींवर होणार धनवर्षाव, जुने वादही मिटणार; तुमची रास यात आहे का?










