'मी बायको अन् मुलीला तलवारीने कापून काढलं', दोघींची हत्या केल्यानंतर बापाने थेट पोलीस स्टेशन गाठलं

मुंबई तक

Crime News : आरोपी सुरजीत याने रागाच्या भरात इतके टोकाचे पाऊल उचलले की, त्याने रक्ताच्या नात्याचीही तमा बाळगली नाही. घटनेच्या वेळी पत्नी झोपेतून नुकतीच उठली होती, तर त्याची लहान मुलगी गाढ झोपेत होती. कोणताही विचार न करता आरोपीने तलवारीने केलेल्या या भीषण हल्ल्यात दोघींचाही जागीच मृत्यू झाला.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'मी बायको अन् मुलीला तलवारीने कापून काढलं'

point

दोघींची हत्या केल्यानंतर बापाने थेट पोलीस स्टेशन गाठलं

Crime News : घरगुती वादातून आणि आर्थिक विवंचनेतून पतीने आपल्या पत्नीसह अवघ्या आठ वर्षांच्या चिमुरडीची तलवारीने वार करून निर्घृण हत्या केली. गुरुवारी पहाटे 6 वाजेच्या सुमारास ही घटना घडली, ज्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी सुरजीत याने रागाच्या भरात इतके टोकाचे पाऊल उचलले की, त्याने रक्ताच्या नात्याचीही तमा बाळगली नाही. घटनेच्या वेळी पत्नी झोपेतून नुकतीच उठली होती, तर त्याची लहान मुलगी गाढ झोपेत होती. कोणताही विचार न करता आरोपीने तलवारीने केलेल्या या भीषण हल्ल्यात दोघींचाही जागीच मृत्यू झाला. घराच्या उंबरठ्यात घडलेल्या या रक्तरंजित खेळाने बिचून गावासह संपूर्ण मोखमपुरा परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. राजस्थानची राजधानी जयपूरजवळील बिचून गावात ही घटना उघडकीस आली आहे.

गुन्हा केल्यानंतर आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर

या घटनेचे सर्वात धक्कादायक पैलू म्हणजे, पत्नी आणि मुलीची हत्या केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला नाही. रक्ताने माखलेल्या अवस्थेत तो थेट मोखमपुरा पोलीस ठाण्यात पोहोचला. तिथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना "मी दोघांनाही मारून टाकलं आहे," असे त्याने शांतपणे सांगितले. आरोपीचे हे शब्द ऐकून पोलीस ठाण्यातील अधिकारीही क्षणभर अवाक झाले. सुरुवातीला पोलिसांना हा बनाव वाटला, मात्र आरोपीच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि त्याची कबुली पाहून पोलीस तातडीने बिचून गावातील त्याच्या घरी रवाना झाले. घराचा दरवाजा उघडताच पोलिसांना मायलेकीचे रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळून आले. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले असून, हा पूर्वनियोजित कट होता की रागाच्या भरात घडलेली कृती, याचा तपास आता सुरू आहे.

हेही वाचा : 'अहो, मला भजी खायची आहेत..', नवऱ्याला कॅन्टीनमध्ये पाठवलं, अन् नवविवाहिता इमरानसोबत पळून गेली!

आर्थिक अडचण आणि सततच्या वादातून घडले हत्याकांड

पोलीस तपासातून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुरजीत आणि त्याची पत्नी सरोज देवी यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून कौटुंबिक कारणावरून खटके उडत होते. घरात असलेली आर्थिक तंगी हे या वादाचे मुख्य मूळ असल्याचे समोर आले आहे. गरिबी आणि वाढत्या खर्चामुळे सुरजीत मानसिक तणावाखाली होता, ज्यातून घरात वारंवार भांडणे होत असत. गुरुवारी सकाळी हा वाद इतका विकोपाला गेला की, सुरजीतने घरातील तलवार काढून पत्नीवर हल्ला चढवला. मध्यस्थी करण्यासाठी किंवा वाचवण्यासाठी तिथे कोणीही नसल्याने तो नराधम आपल्या पोटच्या मुलीवरही धावून गेला. ८ वर्षांच्या वंशिकाचा या वादाशी काहीही संबंध नसताना तिला आपल्या वडिलांच्या क्रूरतेचा बळी ठरावं लागलं. पोलिसांनी दोन्ही मृतदेह दूदू उपजिल्हा रुग्णालयातील शवागारात पाठवले असून शवविच्छेदनानंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात दिले जाणार आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp