20 वर्षीय प्रेग्नंट सोशल मीडिया स्टारच्या हत्येने खळबळ, घरातच आढळला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह; कोणी केली हत्या?

मुंबई तक

Crime News : एका 20 वर्षीय गर्भवती युट्यूबरची तिच्या पतीने निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. तिच्या माहेरीच तिची हत्या झाली. तिचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह बघून आईवडिलांना धक्काच बसला. त्यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. यानंतर पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

20 वर्षीय प्रेग्नंट सोशल मीडिया स्टारच्या हत्येने खळबळ

point

घरातच आढळला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह

point

कोणी केली हत्या?

Crime News : एका 20 वर्षीय गर्भवती युट्यूबरची तिच्या पतीने निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. तिच्या माहेरीच तिची हत्या झाली. तिचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह बघून आईवडिलांना धक्काच बसला. त्यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. यानंतर पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैष्णवी असे मृत महिलेचे नाव असून, ती सोशल मीडियावर बरीच लोकप्रिय होती. धक्कादायक म्हणजे दहा महिन्यांपूर्वीच तिचा विवाह झाला होता. तेलंगणातील जगतियाल जिल्ह्यातील ही घटना आहे. 

हे ही वाचा : बलात्कार प्रकरणातील आरोपी ज्योतीषाने स्थापन केलेल्या संस्थेवर रूपाली चाकणकर संचालक, अंधारेंचे सनसनाटी आरोप

दहा महिन्यांपूर्वी विवाह

मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवी मंगळवारी माधोपूर गावातील तिच्या पालकांच्या घरी रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळली. कोरुतलाचे पोलीस निरीक्षक सुरेश यांनी सांगितले की, वैष्णवीच्या पालकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. वैष्णवीचा विवाह अवघ्या दहा महिन्यांपूर्वी चित्तारी हरिप्रसाद याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही काळातच तिला सासरच्यांकडून त्रासाला सामोरे जावे लागत होते.

हुंड्यासाठी छळ

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी पती हरिप्रसाद याने वैष्णवीचा गळा आवळून आणि त्यानंतर तिच्या चेहऱ्यावर चाकूने वार करून तिची हत्या केली. या हत्येमागे कौटुंबिक कलह आणि हुंड्याची मागणी असल्याचे समोर येत आहे. वैष्णवीचे वडील एस.आर. दुर्गाप्रसाद यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आरोप केला आहे की, लग्नानंतर पती हरिप्रसाद, तिची सासू आणि दीर हुंड्यासाठी वैष्णवीचा सतत छळ करत होते. याच छळातून आणि वादातून ही हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp