फक्त 15 दिवसांपूर्वीच बाळ जन्माला आलेलं, शेजाऱ्याला राग आला अन् केली हत्या, नेमकं काय घडलं?

मुंबई तक

Crime News : माणसाची सहनशीलता आता संपत चालली आहे. किरकोळ कारणांवरुन वाद होऊन अनेकांच्या हत्या झाल्याच्या घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात. मात्र एका व्यक्तीने अशाच किरकोळ वादातून 15 दिवसांच्या नवजात बालकाचा जीव घेतला आहे. उशीने तोंड दाबून शेजारी राहणाऱ्या नराधमाने ही निर्घृण हत्या केली.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

फक्त 15 दिवसांपूर्वीच बाळ जन्माला आलेलं

point

शेजाऱ्याला राग आला अन् केली हत्या

point

नेमकं काय घडलं?

Crime News : माणसाची सहनशीलता आता संपत चालली आहे. किरकोळ कारणांवरुन वाद होऊन अनेकांच्या हत्या झाल्याच्या घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात. मात्र एका व्यक्तीने अशाच किरकोळ वादातून 15 दिवसांच्या नवजात बालकाचा जीव घेतला आहे. उशीने तोंड दाबून शेजारी राहणाऱ्या नराधमाने ही निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून संताप व्यक्त केला जात आहे. मृत बालकाची आई काजल गेल्या काही महिन्यांपासून माहेरी राहत होती, जिथे तिने 15 दिवसांपूर्वीच या मुलाला जन्म दिला होता. 

हे ही वाचा : नाशिक : महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप, ज्योतिषाला अटक; एकनाथ शिंदेंचं भविष्य सांगून आलेला चर्चेत

उशीने तोंड दाबून हत्या

मिळालेल्या माहितीनुसार,बिहारच्या भागलपूरमध्ये ही घटना घडली. मंगळवारी (17 मार्च) सकाळी घरातील सर्व सदस्य छतावर असताना हा प्रकार घडला. घरात लहान मुले खेळत असताना त्यांच्याकडून चुकून शेजाऱ्याच्या घरात चप्पल फेकली गेली होती. यावरून शेजारी जयहिंद पासवान याच्याशी वाद झाला होता. याच वादाचा राग मनात धरून जयहिंद पासवान घरात शिरला. त्यावेळी बाळ खोलीत एकटेच झोपले होते. आरोपीने रागाच्या भरात उशीने बाळाचे तोंड दाबून त्याला मृत्यूच्या दारात ढकलले. विशेष म्हणजे, या कृत्यावेळी आरोपीची पत्नी नीलमदेवी दारावर उभी राहून पाळत ठेवत असल्याची माहिती समोर आली आहे.

हत्या करुन आरोपी फरार

घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याची चप्पल आणि मोबाईल तिथेच विसरला, ज्यामुळे त्याची ओळख पटली. घरातील सदस्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता, सुखदेव पासवान आणि राहुल पासवान यांनी मध्यस्थी करून त्याला पळून जाण्यास मदत केली. रक्ताळलेल्या अवस्थेत आणि बेशुद्ध असलेल्या बाळाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच खरीक पोलीस ठाण्याचे अध्यक्ष नरेश कुमार यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून तपास सुरू केला.

हे वाचलं का?

    follow whatsapp