पुणे हादरलं! आईनेच मुलाचा गळा चिरला; मुलीलाही संपवण्याचा प्रयत्न, वाघोली परिसरातील घटना
Pune crime news : पुणे-नगर महामार्गावरील वाघोली परिसरात मंगळवारी सकाळी मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. एका महिलेने आपल्या अल्पवयीन मुलाचा गळा चिरून खून केला असून, मुलीवरही धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पुणे हादरलं! आईनेच मुलाचा गळा चिरला
मुलीलाही संपवण्याचा प्रयत्न
वाघोली परिसरातील घटना
Pune crime news : पुणे-नगर महामार्गावरील वाघोली परिसरात मंगळवारी सकाळी मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. एका महिलेने आपल्या अल्पवयीन मुलाचा गळा चिरून खून केला असून, मुलीवरही धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
हे ही वाचा : आईनेच तान्हुल्या बाळाला रस्त्याच्या कडेला फेकून दिलं, भटक्या जनावरांनी लचके तोडले; डॉक्टरांकडे नेईपर्यंत जीव गेला
'असा' घडला थरार
ही घटना सकाळी सुमारे 9.10 ते 9.15 वाजण्याच्या दरम्यान महाराष्ट्र बँकेजवळील बाईक रोड परिसरातील एका भाड्याच्या घरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनी संतोष जायभाय असे आरोपी महिलेचे नाव आहे. तिने आपल्या साईराज संतोष जायभाय (वय 11) या मुलाचा राहत्या घरात गळा चिरून निर्घृण खून केला. त्यानंतर तिने धनश्री संतोष जायभाय (वय 13) या मुलीवरही हल्ला करून तिचा गळा कापण्याचा प्रयत्न केला.
मुलीचा आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांची धावाधाव
हल्ल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत धनश्रीने आरडाओरडा सुरू केला. तिचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी घराकडे धाव घेतली. रक्तबंबाळ अवस्थेत धनश्रीने दरवाजा उघडताच शेजाऱ्यांनी तिला तातडीने वाघोली येथील लाईफ केअर रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती सध्या गंभीर असून डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत.










